Accenture Layoffs 2025: 11,000 Employees Fired: AI साठी 11 हजार कर्मचाऱ्यांच्या पोटावर लाथ

Accenture Layoffs 2025: 'एआय'मुळे भविष्यात खर्चात कपात होईल असा विश्वास अनेक कंपन्यांना वाटतो आहे तसा तो ॲक्सेंचरलाही वाटतो आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Accenture Layoffs: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कंपनी असलेल्या ॲक्सेंचरने एक मोठा निर्णय घेतला आहे. ॲक्सेंचरने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत प्रणाली अंमलात आणण्याचा निर्णय घेतला असून यासाठी  ॲक्सेंचरने गेल्या तीन महिन्यांत तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांमध्ये 'एआय' साठी आवश्यक कौशल्ये शिकण्याची क्षमता नाही, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी ज्यांना एआयची कौशल्य आत्मसात आहेत अशा नव्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याचे सूतोवाचही ॲक्सेंचरने केले आहे. ॲक्सेंचरनेने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत प्रणाली अंमलात आणण्यासाठी, जुन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कर्मचाऱ्यांना काही ठराविक रक्कम देण्यासाठी 7,093 कोटी रुपये ($865 दशलक्ष) खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

नक्की वाचा: दसरा कसा होईल हसरा ? सोन्या-चांदीचे दर ऐकून तोंडचे पाणी पळाले

ॲक्सेंचरच्या सीईओ जुली स्वीट यांनी या सगळ्या घडामोडींबाबत बोलताना म्हटले की, कर्मचाऱ्यांना 'अपस्किल' करणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत.  मात्र  ज्या कर्मचाऱ्यांना नव्याने शिकवणे शक्य नाही त्यांना आम्ही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात एआयमुळे अनेकांची नोकरी जाईल अशी भीती वर्तवण्यात येत होती, ॲक्सेंचरने घेतलेल्या निर्णयामुळे ती खरी होऊ लागल्याचे दिसते आहे. ज्यांच्या अंगी एआय आधारीत कौशल्ये नाहीत त्यांच्यावर नोकरी गमावण्याची अथवा नोकरी न मिळण्याची टांगती तलवार आहे. ॲक्सेंचरने मे ते ऑगस्ट या कालावधीत जगभरातील आपल्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 791,000 वरून 779,000 पर्यंत खाली आणली आहे.

नक्की वाचा: ATM मधून निघणार PF चे पैसे, 7.8 कोटी खातेधारकांना मोठा दिलासा

'एआय'मुळे भविष्यात खर्चात कपात होईल असा विश्वास अनेक कंपन्यांना वाटतो आहे तसा तो ॲक्सेंचरलाही वाटतो आहे. एआयमुळे व्यवसायाच्या विस्तारीकरणाला बराच वाव आहे असेही या कंपन्यांचे म्हणणे आहे.  गेल्या सहा महिन्यांत ॲक्सेंचरने 'एआय कन्सल्टिंग'मधून सुमारे ₹21,320 कोटी ($2.6 अब्ज) महसूल मिळवला आहे. यामुळे एआयवर अधिक भर देण्याचा निर्णय ॲक्सेंचरने घेतला आहे. कुशल मनुष्यबळ मिळवण्यासाठी करण्यात आलेले बदल, निर्गुंतवणूक यामुळे जी रक्कम मिळेल ती कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि व्यवसायवृद्धीसाठी गुंतवली जाईल असेही कंपनीचे म्हणणे आहे.  

Topics mentioned in this article