मुंबई:
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
( नक्की वाचा : Bhadla-Fatehpur HVDC Project: अदाणी एनर्जीला मिळाले 25 हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम )
Adani Energy Solutions Q3 Results : अदाणी ग्रुपमधील ऊर्जा क्षेत्राशी संबंधित अदाणी एनर्जी सोल्यूशन्स कंपनीनं डिसेंबर तिमाहीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 73 टक्के वाढला असून 325 कोटींवरुन 562 कोटींवर पोहोचला आहे.
या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात देखील 28 % वाढ झाली आहे. कंपनीचे उत्पन्न 4,562.7 कोटींवरुन 5,830 कोटी झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अदाणी एनर्जी सोल्यूशन्सची Q 3 मधील कामगिरी (YOY)
- नफा 73% ने वाढला. 325 कोटी रुपयांवरून 562 कोटी रुपये.
- उत्पन्नामध्ये 28% वाढ. 4,562.7 कोटी रुपयांवरून 5,830 कोटी रुपये उत्पन्न.
- EBITDA 39% ने वाढून रु. 1,527 कोटींवरून रु. 2,125 कोटी झाले.
- मार्जिन 33.5% वरून 36.5% पर्यंत वाढले.
अदानी एनर्जी सोल्युशन्सचा ट्रान्समिशन महसुलामध्ये तब्बल 82% वाढ झाली आहे. हा महसूल आता 2034.76 कोटी रुपये झाला आहे. तर वितरण महसूल 16% वाढून 2972.42 कोटी रुपये झाला आहे.