जाहिरात

Bhadla-Fatehpur HVDC Project: अदाणी एनर्जीला मिळाले 25 हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम

अदाणी समूहातील कंपन्यांपैकी अदाणी ग्रीन एनर्जी सोल्युशन्स ही देखील एक महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीने त्यांच्या आजवरच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कामाची ऑर्डर मिळवली आहे.

Bhadla-Fatehpur HVDC Project: अदाणी एनर्जीला मिळाले 25 हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम
Bhadla-Fatehpur HVDC Project : या प्रकल्पामुळे राजस्थानात निर्माण होणारी स्वच्छ ऊर्जा उत्तर भारतापर्यंत आणि राष्ट्रीय ग्रीडपर्यंत पोहचवणे सोपे होईल.
मुंबई:

अदाणी समूहातील कंपन्यांपैकी अदाणी ग्रीन एनर्जी सोल्युशन्स ही देखील एक महत्त्वाची कंपनी आहे. या कंपनीने त्यांच्या आजवरच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कामाची ऑर्डर मिळवली आहे. राजस्थानातील भादला आणि उत्तर प्रदेशातील फतेहपूरदरम्यानच्या उच्च दाब थेट वीजजोडणी प्रकल्पाची ही ऑर्डर असून हे काम 25 हजार कोटी रुपयांचे असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अदाणी एनर्जीने निविदा प्रक्रियेत यशस्वी बोली लावत मिळवलेले आजवरचते हे सगळ्यात मोठे काम आहे.    नव्या ऑर्डरनंतर अदाणी एनर्जीची 54 हजार 761 कोटींची कामे देशभरात सुरू असल्याचे या कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. कंपनीचे वीजवहनाचे जाळे 25778 CKM (सर्किट किलोमीटर) होणार असून वहन क्षमता 84186 MVA पर्यंत पोहचणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भादला-फतेहपूर प्रकल्पासाठी अदाणी एनर्जीने शुल्क आधारीत बोलीत भाग घेतला होता आणि REC ऊर्जा विकास आणि सल्लागार लिमिटेड कंपनी ही या निविदा प्रक्रियेसाठी संयोजकाची भूमिका बजावत होती . “Transmission system for evacuation of power from REZ in Rajasthan (20 GW) under Phase-III Part I.” असं या प्रकल्पाला नाव देण्यात आले असून, या प्रकल्पाअंतर्गत 6000 मेगावॅट वीज राजस्थानातील भादलाहून उत्तर प्रदेशातील फतेहपूरपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे राजस्थानात निर्माण होणारी स्वच्छ ऊर्जा उत्तर भारतापर्यंत आणि राष्ट्रीय ग्रीडपर्यंत पोहचवणे सोपे होईल.  हा प्रकल्प 4.5 वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. पर्यावरणाला हानी पोहचू नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक HVDC तंत्रज्ञानाचा अनुभव असलेली अदाणी एनर्जी ही भारतातील एकमेव कंपनी असून या कंपनीला मिळालेला हा अशा प्रकारचा तिसरा प्रकल्प आहे.

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com