अदाणी ग्रीन एनर्जीचा नवा विक्रम, जगातील पहिली Water Positive Renewable Energy कंपनी होण्याचा मिळवला मान

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

स्वच्छ उर्जा निर्माण करणाऱ्या अदाणी ग्रीन एनर्जीने एक विक्रमी टप्पा पार केला आहे. अदाणी ग्रीन एनर्जीने वापरत असलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाचवलं आहे. अदाणी ग्रीन एनर्जी ही कंपनी, हा विक्रमी टप्पा गाठणारी,  जगातील पहिल्या 10 कंपन्यांपैकी पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. अदाणी ग्रीन एनर्जीने हे उद्दीष्ट्य गाठण्यासाठी 2026 पर्यंतचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र ठरवलेल्या कालमर्यादेच्या आधीच अदाणी ग्रीन एनर्जीने हे उद्दीष्ट्य गाठले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इंटरटेक नावाच्या कंपनीने अदाणी ग्रीन एनर्जीच्या 103 उर्जा निर्मिती स्थळांना आणि 85 पाणी साठवण्याच्या ठिकाणांना भेट दिली होती. या कंपनीने अदाणी ग्रीन एनर्जी ही पाण्याच्या बाबत अत्यंत जागरूक आणि सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ असा की अदाणी ग्रीन एनर्जी जितक्या पाण्याचा वापर करते, त्यापेक्षा जास्त पाणी ती वाचवते. अदाणी ग्रीन एनर्जी असा मान मिळवणारी भारतातील एकमेव कंपनी बनली आहे.

Advertisement

अदाणी ग्रीन एनर्जीने मिळवलेला हा मान खूप मोठा आहे, कारण अदाणी ग्रीन एनर्जीचे बहुतांश प्रकल्प हे पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या किंवा वाळवंटी प्रदेशात आहेत. अशा ठिकाणी पाणी मिळणे हे खूप अवघड काम असते. अदाणी ग्रीन एनर्जीने या ठिकाणांचा कायापलट केला असून ती शाश्वत बनवली आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास राजस्थान आणि गुजरातचे देता येईल, जिथे त्यांनी पाणी वाचवण्याचे मार्ग शोधून काढले आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : उत्तर प्रदेश सरकार आणि अदाणी समूहात वीज पुरवठ्याबाबत झाला करार )

अदाणी ग्रीन एनर्जीने , 467ऑलिम्पिक आकाराच्या स्विमिंग पूलसाठी जितके पाणी लागते तितके पाणी वाचवले आहे. लक्षद्वीपवर राहणाऱ्या सगळ्या लोकांना सहा महिने पुरेल इतके हे पाणी आहे.  अदाणी ग्रीन एनर्जीने 85 तलावांची दुरुस्ती केली असून यामुळे 123,000 हून अधिक जणांना फायदा होत आहे. या लोकांना पूर्वी पुरेसे पाणी मिळत नव्हते.  पाण्याची बचत व्हावी यासाठी अदाणी ग्रीन एनर्जीने सोलार पॅनलची सफाई करण्यासाठी रोबोटीक यंत्रणेचा वापर केला आहे, यामुशे वर्षाकाळी अंदाजे 546 दशलक्ष पाण्याची बचत होते.  

Advertisement

2023 साली अदाणी ग्रीन एनर्जीने निर्धार केला होता की जितके पाणी वापरले जाते त्यापेक्षा जास्त पाणी वाचवायचे. यासाठी कंपनीने 2026 पर्यंतचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य कंपनीने ठरवलेलेल्या वेळेच्या एक वर्ष आधीच गाठलं आहे. भारतातील अनेकांना पुरेसे पाणी मिळत नाही. ही बाब लक्षात ठेवत अदाणी ग्रीन एनर्जीने जितके शक्य होईल तितक्या पाण्याची बचत करण्याचे ठरवले होते. ही बाब व्यवसायासाठीच नाही तर पर्यावरणासाठीही महत्त्वाची होती. पाण्याची बचत करण्यासाठी अदाणी ग्रीन एनर्जीने पाण्याच्या वापराशिवाय सोलार पॅनलची सफाई करणे, तलावांची खोली वाढवणे, पावसाचे पाणी साठवणे, इतकंच नाही तर हवेतून पाण्याची निर्मिती करणे असे मार्ग अवलंबले आहेत. 

अदाणी ग्रीनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही फक्त हरीत उर्जा बनवत नसून त्यासाठी आम्ही पर्यावरणपूरक मार्गही अवलंबतो आहे. पर्यावरणातील बदलामुळे भारतासह अनेक देशांमध्ये पाणी संकट तीव्र होत चालले आहे. भारतातील लोकसंख्येच्या तुलनेत सगळ्यांना पुरेल इतके पाणी नाहीये, पाण्याचा वापरही बराच आहे. यामुळे पाणी वाचवणे हे अत्यंत गरजेचे आहे.  वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वाचवण्यासोबतच अदाणी ग्रीन एनर्जी एकल-वापर प्लॅस्टीकचा वापर न करणे कचरा लँडफिलमध्ये (कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जागी) न टाकणे हे कटाक्षाने पाळते. अदाणी ग्रीन एनर्जीने पर्यावरणाबद्दल असलेली कटीबद्धता कसोशीने पाळली आहे. याच कटीबद्धतेमुळे अदाणी ग्रीन एनर्जीने एक आदर्श निर्माण केला आहे.

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Topics mentioned in this article