जाहिरात

उत्तर प्रदेश सरकार आणि अदाणी समूहात वीज पुरवठ्याबाबत झाला करार

उत्तर प्रदेश सरकार आणि अदाणी समूहात वीज पुरवठ्याबाबत झाला करार
उत्तर प्रदेश सरकार अदाणी पॉवर लिमिटेडकडून वीज खरेदी करणार, कॅबिनेटनं दिली मंजुरी
मुंबई:

उत्तर प्रदेश सरकार 2034 पर्यंत राज्याच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अदाणी पॉवर लिमिटेडकडून 1,500 मेगावॅट वीज खरेदी करणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं मंगळवारी (6 मे 2025) याबाबतच्या कराराला मंजुरी दिली आहे. उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री ए.के. शर्मा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीतील निर्णयाची माहिती देताना सांगितलं का,सरकारने मंगळवारी स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे 2x800 मेगावॅट (1,600 मेगावॅट) औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून 1,500 मेगावॅट वीज खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )


यासंदर्भात घेण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अदाणी पॉवर लिमिटेडला यशस्वी बोलीदार घोषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याने देऊ केलेला सर्वात कमी दर 5.383 रुपये होता. राज्याला वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2033-34 पर्यंत 10,795 मेगावॅट अतिरिक्त औष्णिक उर्जेची आवश्यकता असेल, असं शर्मा यांनी स्पष्ट केले. 

शर्मा याबाबत बोलताना म्हणाले की, अदाणी पॉवर लिमिटेड ही निविदा प्रक्रियेत सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून उदयास आली.त्यांनी प्रति युनिट 3.727 रुपये निश्चित शुल्क, प्रति युनिट 1.656 रुपये इंधन शुल्क आणि एकूण 5.383 रुपये प्रति युनिट शुल्क सांगितले केले. कंपनीसोबत 25 वर्षांच्या कालावधीसाठी वीजपुरवठा करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com