Adani Group Tax Payment : अदाणी समूहाकडून 74,945 कोटींचा करभरणा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ

अदाणी समूहाच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL), अदानी सिमेंट लिमिटेड (ACL), अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) यांचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Adani Group Tax Payment : आर्थिक वर्षात 2025 मध्ये अदाणी समूहाच्या कंपन्यांनी भारत सरकारला भरलेला कर मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 29 टक्क्यांनी वाढून 74,945 कोटी रुपये झाला आहे. अदाणी समूह देशातील सर्वात मोठ्या करदात्यांमध्ये सातत्याने आहे. अदाणी समूहाने निवेदन जारी करत म्हटलं की, 2025 या आर्थिक वर्षात, अदाणी समूहाचे एकूण योगदान 29 टक्क्यांनी वाढून 74,945 कोटी झाले. जे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 58,104 कोटी होते. 

अदाणी समूहाच्या 74,945 कोटींच्या एकूण कर योगदानापैकी, प्रत्यक्ष योगदान 28,720 कोटी, अप्रत्यक्ष योगदान 45,407 कोटी, तर इतर योगदान 818 कोटी इतके आहे. अदाणी समूहाने सरकारला भरलेल्या रकमेची तुलना केली तर ती संपूर्ण मुंबई मेट्रो नेटवर्क बांधण्यासाठी लागणाऱ्या अंदाजित खर्चा एवढी आहे, जी लाखो लोकांसाठी पायाभूत सुविधांची जीवनरेखा आहे. तसेच आधुनिक काळातील ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी देखील ही रक्कम पुरेशी आहे.

Advertisement

अदाणी समूहाच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL), अदाणी सिमेंट लिमिटेड (ACL), अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) आणि अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) यांचा समावेश आहे.

समूहाच्या सात सूचीबद्ध संस्था 

अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, अदाणी टोटल गॅस लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेड यांनी प्रकाशित केलेल्या स्वतंत्र वार्षिक अहवालांमध्ये ही माहिती आहे. यामध्ये सात कंपन्यांच्या मालकीच्या इतर तीन सूचीबद्ध कंपन्या एनडीटीव्ही, एसीसी आणि सांघी इंडस्ट्रीज - यांनी भरलेला कर देखील समाविष्ट आहे.

Topics mentioned in this article