Adani Group ची मोठी घोषणा, ओडिशामध्ये 5 वर्षांमध्ये करणार 2.3 लाख कोटींची गुंतवणूक

Adani Group : ओडिशाच्या विकासाची गती वाढवण्यासाठी अदाणी समूहानं खास योजना तयार केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


Adani Group : ओडिशाच्या विकासाची गती वाढवण्यासाठी अदाणी समूहानं खास योजना तयार केली आहे. अदाणी समूह पुढील पाच वर्षांमध्ये राज्यात 2.3 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. वीज, सिमेंट, इंडस्ट्रियल पार्क, ॲल्युमिनियम आणि सिटी गॅस यांसारख्या क्षेत्रात ही गुंतवणूक केली जाणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अदाणी पोर्ट्स आणि एसईझेडचे (APSEZ) व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची भेट घेतली. त्या भेटीत पुढील पाच वर्षांतील ओडिशामधील गुंतवणूकीसाठी सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (28 जानेवारी) ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये  'उत्कर्ष ओडिशा-मेक इन ओडिशा कॉन्क्लेव 2025' या कार्यक्रमाचं मंगळवारी उद्घाटन केलं. 'उत्कर्ष ओडिशा 2025' अंतर्गत कोणत्याही समूहाकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, असं अदाणी समूहानं स्पष्ट केले. 

या विशेष प्रसंगी, धामरा हवाई पट्टीवर पहिले चाचणी उड्डाण यशस्वीरित्या उतरले. ओडिशासाठी नवीन संधीची दारं उघडण्यासाठी या विमानतळाचा भविष्यात उपयोग होणार आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Adani Energy Solutions Q3 Results: अदाणी एनर्जीची दमदार कामगिरी, नफ्यात 73 टक्के वाढ )
 

उत्कर्ष ओडिशाच्या निमित्ताने अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL) ने ओडिशात सहा प्रकल्प लाँच केले. यामध्ये भुवनेश्वर विमानतळावरील ईव्ही चार्जिंग स्टेशन आणि सिटी गेट स्टेशन कम मदर स्टेशन प्रकल्पाचा समावेश आहे.

इतर प्रकल्पांमध्ये भद्रक येथे एलएनजी आणि बहु-इंधन हबची पायाभरणी, बालासोर येथील सीएनजी स्टेशन, भद्रक येथे घरगुती पाईपयुक्त स्वयंपाक गॅसचा शुभारंभ आणि मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर येथे पहिला सीएनजी स्टेशन प्रकल्प यांचा समावेश आहे. हे प्रकल्प लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होतील, असे समूहाने स्पष्ट केले.

Advertisement

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Topics mentioned in this article