अदाणी समूहाच्या विळिण्यम बंदराने रचला इतिहास, 2000 हून अधिक कंटेनर घेऊन पहिली मदर शिप दाखल

विळिण्यम खासियत अशी आहे की हे देशातील पहिलं सेमी ऑटोमेटेड कंटेनर टर्मिनल आहे. हायड्रोजन आणि अमोनिया सारख्या स्वच्छ आणि हिरव्या इंधनांचा पुरवठा करण्यासाठी हे जागतिक बंकरिंग हब देखील असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

केरळमधील भारतातील पहिल्या ट्रान्स शिपमेंट अदाणी समूहाच्या विळिण्यम बंदरावर गुरुवारी (11 जुलै) पहिली मदर शिप दाखल झाली. जगातील दुसरी सर्वात मोठी शिपिंग कंपनी 'मर्क्स'चं 'सॅन फर्नांडो' हे जहाज 2000 हून अधिक कंटेनर घेऊन या बंदरावर दाखल होत इतिहास रचला आहे. यावेळी या भल्यामोठ्या जहाजाला पारंपरिक पद्धतीने सलामी देण्यात आली. 

अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी एक्स अकाऊंटवर ट्वीट करत म्हटलं की, "आजचा दिवस ऐतिहासिक आहे. विळिण्यम बंदरावर पहिल्या कंटेनर जहाजाचं स्वागत केलं. ग्लोबल ट्रान्सशिपमेंट सेक्टरमधील भारताच्या प्रवेशासाठी हा मैलाचा दगड आहे. या सोबतच भारताने सागरी मार्गाने लॉजिस्टिक्सच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. विळिण्यम आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गातील एक मोठं बंदर म्हणून नावारुपाला याला आलं आहे. जय हिंद"

पहिल्या मदर शिपच्या येण्याने अदाणी समूहाच्या विळिण्यम बंदराने आंतरराष्ट्रीय शिपिंग व्यवसायात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या ऐतिहासिक क्षणी केरळचे मंत्री व्ही एन वासवन, अदाणी बंदराचे अधिकारी आणि केरल सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आज यासाठी खास समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभानंतर मदर शिप कोलंबोसाठी रवाना होणार आहे. यानंतर अनेक जहाज याठिकाणी येणार आहेत. 

Advertisement

बंदराचं पहिल्या टप्प्यातील काम होणार समाप्त

शुक्रवारी अधिकारीकरित्या या बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम समाप्त होणार आहे. बंदरावर 3000 मीटरचं ब्रेकवॉटर आणि 800 मीटरचं कंटेनर बर्थ आता पूर्णपणे तयार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 1.7 किमीचा रस्ता देखील जवळपास तयार आहे. 

देशातील पहिला सेमी ऑटोमेडेट कंटेनर टर्मिनल

विळिण्यम खासियत अशी आहे की हे देशातील पहिलं सेमी ऑटोमेटेड कंटेनर टर्मिनल आहे. हायड्रोजन आणि अमोनिया सारख्या स्वच्छ आणि हिरव्या इंधनांचा पुरवठा करण्यासाठी हे जागतिक बंकरिंग हब देखील असेल. काही महिन्यांत बंदरातील पूर्ण व्यावसायिक उपक्रम सुरू होणार आहेत. बंदराचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं काम 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. 

Advertisement

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Topics mentioned in this article