Adani Ports NCDs : अदाणी पोर्ट्सने 15 वर्षांच्या NCDs मधून 5000 कोटी उभारले, सर्वात मोठा देशांतर्गत बॉन्ड LIC कडून सबस्क्राईब

देशातील सर्वात मोठी ट्रान्सपोर्ट युटिलिटी कंपनी, अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ), ने आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा देशांतर्गत बॉन्ड इश्यू (NCD) यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

देशातील सर्वात मोठी ट्रान्सपोर्ट युटिलिटी कंपनी, अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ), ने आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा देशांतर्गत बॉन्ड इश्यू (NCD) यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

कंपनीने 15 वर्षांच्या कालावधीसाठी नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (NCDs) द्वारे 5,000 कोटी रुपये उभे केले आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) हा संपूर्ण बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला आहे.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

7.75% वार्षिक व्याज दर निश्चित

APSEZ ने सर्व प्रमुख देशांतर्गत रेटिंग एजन्सीज - CRISIL, ICRA, CARE आणि इंडिया रेटिंग्स कडून आपली 'AAA/स्थिर' रेटिंग कायम ठेवली आहे.

या बॉन्डवर कंपनीने 7.75% वार्षिक कूपन दर निश्चित केला आहे आणि तो BSE वर लिस्ट केला जाईल. या निधीचा उपयोग कंपनीच्या यूएस डॉलर बॉन्ड्सच्या प्रस्तावित बायबॅकसाठी केला जाईल, याबाबत अंतिम निर्णय 31 मे रोजी बोर्ड बैठकीत होईल.

या बॉन्ड इश्यूमुळे अदाणी पोर्ट्सला दीर्घकालीन भांडवल, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि आर्थिक लवचिकता मिळेल. तसेच, यामुळे कंपनीला तंत्रज्ञानात गुंतवणूक, नावीन्य आणि कार्यक्षमता वाढविण्यात मदत होईल.

( नक्की वाचा : अदाणी एअरपोर्ट आणि इंडिगोची संयुक्त घोषणा, NMIA खुले होताच पहिल्या दिवसापासून इंडिगोची विमाने झेपावणार )
 

कर्जाचा कालावधी वाढला, गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत

या व्यवहारामुळे अदाणी पोर्ट्सच्या कर्जाचा सरासरी कालावधी 4.8 वर्षांवरून 6.2 वर्षांपर्यंत वाढला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,  हा केवळ निधी उभारणीचा प्रकार नाही, तर दीर्घकालीन धोरणात्मक भांडवल व्यवस्थापन योजनेचा भाग आहे. याचा उद्देश कमी व्याजदरावर भांडवल उभारणे, कर्जाचे प्रोफाइल सुधारणे आणि निधी स्रोतांमध्ये विविधता आणणे हा आहे.

Advertisement

कंपनीचे सीईओ अश्विनी गुप्ता यांनी सांगितलं की, '2030 पर्यंत 1 अब्ज टन माल हातळण्याचं आमचं लक्ष्य आहे. जे 2025 च्या आर्थिक वर्षातील आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. हा बॉन्ड इश्यू आमच्या दीर्घकालीन दृष्टीला बळकटी देईल.'

आंतरराष्ट्रीय विस्तारही सुरू

अदाणी पोर्ट्स भारतात पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यांवर एकूण 15 बंदरांचे संचालन करते. यामध्ये बंदरांमधून होणाऱ्या एकूण वाहतुकीमधील 27 टक्के वाहतुकीचा समावेश आहे. भारताबाहेर, कंपनी श्रीलंकेतील कोलंबो, इस्त्राईलच्या हाइफा आणि टांझानियातील डार एस सलाम पोर्टवरही काम करत आहे.
 

Advertisement

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world