
भारतातील सगळ्यात मोठी विमान वाहतूक कंपनी असलेल्या Indigo Airlines आणि अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) यांनी संयुक्तरित्या एक घोषणा केली. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर व्यावसायिक वाहतुकीला सुरूवात होताक्षणी पहिल्या दिवसापासून इंडिगोची विमाने 15 शहरांकडे झेपावतील. 15 विमानांद्वारे 18 उड्डाणे संचालित केली जातील असे जाहीर करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की सुरुवातीला या विमानतळावरून 18 उड्डाणे होतील, नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही संख्या 79 उड्डाणांपर्यंत नेली जाणार आहे. यातील 14 उड्डाणे ही इतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील.
मार्च 2026 पर्यंत उड्डाणांची संख्या दिवसाला 100 पर्यंत (200 एअर ट्रॅफिक मूव्हमेंटपर्यंत)पोहोचेल असे दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरित्या जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर 2026 पर्यंत उड्डाणांची संख्या दिवसाला 140 (280 एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स) पर्यंत पोहोचेल. इंडिगो चे सीईओ पीटर एल्बर्स यांनी म्हटले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणारी इंडिगो ही पहिली हवाई वाहतूक कंपनी असणार आहे. याबाबतची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. प्रवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि भारताच्या वाढत्या हवाई क्षेत्रासाठी इंडिगोच्या योगदानाची कटीबद्धता दर्शवण्यासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे असेही त्यांनी म्हटले.
( नक्की वाचा : Gautam Adani : "ईशान्येकडील राज्यांत अदाणी समूह 1 लाख कोटींची गुंतवणूक करणार" )
अदाणी एअरपोर्टचे लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी म्हटले की, इंडिगो ही नवी मुंबई विमानतळावरून संचालन करणारी पहिली एअरलाइन्स कंपनी असणार आहे. या संयुक्त प्रयत्नांमुळे लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल तसेच त्यांना अधिक सुविधा देणेही शक्य होईल.
IndiGo and Adani Airports come together to fuel aviation growth in India, as IndiGo becomes the first airline to commence flights from Navi Mumbai International Airport.@navimumairport @AdaniOnline pic.twitter.com/EWhqBGHBHe
— IndiGo (@IndiGo6E) May 28, 2025
नवी मुंबई विमानतळ सज्ज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक केंद्र बनण्यासाठी सज्ज आहे. इथे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील, प्रवाशांसाठी चांगल्या सोयी असतील आणि अव्याहत कनेक्टिव्हिटी प्रदान करणेही शक्य होणार आहे. या विमानतळाचे भौगोलिक ठिकाण, उन्नत पायाभूत सुविधा यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जागतिक हवाई वाहतूक प्रवासाचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. सुरुवातीच्या टप्प्यात या विमानतळावरून वर्षाला 2 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील आणि 0.5 मिलियन मेट्रिक टन मालाची वाहतूक करणे शक्य होईल. विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या विमानतळावरून वर्षाला 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील आणि 3.2 मिलियन मेट्रिक टन मालाची वाहतूक करणे शक्य होईल.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world