Economic Survey : AI मुळे देशातील नोकऱ्यांवर होणार परिणाम, आर्थिक पाहणी अहवालात गंभीर इशारा

Economic Survey : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Union Budget 2025) पूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात पुढील पाच वर्षांमध्ये AI चा देशातील नोकऱ्यांवर काय परिणाम होईल? याबाबतचं निरीक्षण नोंदवलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Economic Survey  : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ची व्याप्ती जगभरात वाढत आहे. सर्वांचं काम सोपं करण्यासाठी AI चा उपयोग होतोय. जगभरातील उद्योगांमध्येही AI चा स्वीकार करणे सुरु झाले असून त्यामुळे काही बदल होत आहेत. AI मुळे नोकाऱ्यांवर काय परिणाम होणार ही चिंता अनेकांना सतावत असते. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Union Budget 2025) पूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात पुढील पाच वर्षांमध्ये AI चा देशातील नोकऱ्यांवर काय परिणाम होईल? याबाबतचं निरीक्षण नोंदवलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

68 टक्के नोकऱ्यांवर परिणाम!

भारतीय अर्थव्यवस्था ही सेवा प्रधान (services-led economy) आहे. त्यामुळे देशातील कामगार बाजारपेठेत AI च्या परिणामांबद्दल काळजीचं वातावरण आहे, असं या आर्थिक सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलं आहे. 

आयआयएम अहमदाबादच्या सर्वेक्षणात 68% 'व्हाईट कॉलर' कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या पुढील पाच वर्षांत "एआय द्वारे अंशतः किंवा पूर्णपणे स्वयंचलित" होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालाचा संदर्भही संसदेत देण्यात आला. 

जागतिक कामगार संघटनेच्या अंदाजानुसार जगभरातील जवळपास 75 दशलक्ष नोकऱ्यांना AI मुळे ऑटोमेशनचा पूर्ण धोका आहे. 

जागतिक स्तरावर जवळपास 75 दशलक्ष नोकऱ्यांना AI मुळे ऑटोमेशनचा पूर्ण धोका, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि समाजशास्त्रज्ञांच्या विश्लेषणानुसार देशातील श्रमिक बाजाराची घडी AI मुळे येत्या काळात विसक्टण्याची शक्यता आहे, असं आर्थिक सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलंय. 

Advertisement

( नक्की वाचा : Economic Survey Report : आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय ? जाणून घ्या सर्वकाही )

आव्हानं आणि संधी

AI मुळे श्रमिक बाजारासमोर आव्हानं असली तरी संधी देखील आहेत, असं मत या अहवालात व्यक्त करण्यात आलं आहे. हा संदर्भ समजावून सांगताना या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक (World Bank) यांच्या संशोधन पेपरचा संदर्भ देण्यात आला आहे. 

या संशोधन पेपरनुसार,भारतामधील सर्वच भागातील आणि उद्योगातील कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायात AI कौशल्यांमध्ये मोठ्या प्रमणात वाढ केली आहे. त्यांच्या निष्कर्षानुसार या नोकऱ्या 13 ते 17 टक्के अधिक प्रिमियम पगार देतात. 

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार अधिक भांडवल आणि मोठ्या बँकांमध्येही कामासाठी AI चा वापर होत असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली आहे.
 

Topics mentioned in this article