RIL शेअर विका ! Ambit चा सल्ला; दिवसभरात शेअर्स 4 टक्क्यांनी गडगडले

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

अँबिट कॅपिटलने (Ambit Capital Pvt.) रिलायंस इंडस्ट्रीज (RIL) च्या शेअरसाठी आपली 'SELL' रेटिंग कायम ठेवली आहे. अँबिट ही ब्रोकरेज फर्म असून त्यांनी RIL साठी 'विक्री'चा सल्ला देताना म्हटले आहे की,  रिलायन्स समूहामध्ये बदलाचा कोणताही बिंदू दिसून येत नाही.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अँबिटने 'रिलायन्स'च्या शेअरसाठी तीन महिन्यांपूर्वीही 'विक्री'चा सल्ला दिला होता. अँबिटने हा सल्ला कायम राखला आहे मात्र शेअर्सच्या किंमतीत थोडी सुधारणार केली आहे. रिलायन्सचा शेअर 2600 रुपयांपर्यंत पडेल असा पूर्वी अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अँबिटने यामध्ये थोडा सुधार केला असून हा शेअर 2650 रुपयांपर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तवला आहे. गुरुवारी रिलायन्सचा शेअर कामकाज सुरू होताच 2873 वर ओपन झाला होता. 2813 वर हा शेअर क्लोज झाला. दिवसभरात या शेअरच्या दरात 115 रुपयांनी घसरण पाहायला मिळाली.  

( नक्की वाचा : अदाणी आणि Google मध्ये ऐतिहासिक करार, 'या' क्षेत्रात करणार एकत्र काम )

अँबिटने म्हटलंय की कंझ्युमर म्हणजेच रिलायन्सच्या ग्राहकोपयोगी विभागातील  व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठीची कामगिरी सतत घसरती आहे. 20 सप्टेंबरनंतर या कंपनीच्या कामगिरीत आणखी घसरण होत गेल्याचं अँबिटचे म्हणणे आहे. जीवाश्म इंधन आणि ग्राहपयोगी व्यवसास वगळता इतर एकही कंपनी नफा कमावताना दिसत नसल्याचंही अँबिटचं म्हणणं आहे.

Topics mentioned in this article