Bajaj Chetak: 'या' नव्या लुकमध्ये बजाज चेतक मार्केटमध्ये दाखल, पाहा खास फिचर्स आणि किंमत

Bajaj Chetak Electric Scooter : जाज कंपनीनं त्यांच्या स्पेशल चेतक स्कुटरसह मार्केटमध्ये पुनरागमन केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Bajaj Chetak Electric Scooter : 1980 आणि 1990 च्या दशकात भारतीय मध्यवर्गीयांच्या आयुष्यात बजाज स्कुटरचं खास स्थान होतं. कंपनीची 'बजाज चेतक' हा ब्रँड विशेष लोकप्रिय होता. बजाज कंपनीनं त्यांच्या स्पेशल चेतक स्कुटरसह मार्केटमध्ये पुनरागमन केलं आहे. कंपनीनं चेतक इलेक्ट्रीक ही नवी स्कुटर लाँच केली आहे. कंपनीनं या स्कुटरला 'Chetak35Series' असं नाव दिलंय.नवी चेतक स्कुटर दिसायला जुन्या मॉडेलसारखी असली तरी त्यामध्ये अनेक बदल आहेत, असं कंपनीनं स्पष्ट केलंय. चेतक इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

किती आहे किंमत?

Chetak35Series मधील 3501 आणि 3502 या दोन मॉडेलच्या स्कुटर कंपनीनं लाँच केल्या आहेत. या स्कुटरची किंमक ही अनुक्रमे 1,27, 243 आणि 1,20,000 इतकी आहे, असं वृत्त 'इकोनॉमिक्स टाईम्स' नं दिलंय. जुन्या मॉडेलपेक्षा या स्कुटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पूर्वीपेक्षा ही स्कुटर रेंज, स्टोरेज स्पेस आणि आराम यामध्ये अधिक सरस आहेत.

काय आहे खासियत?

बजाजची नवी चेतक स्कुटर दिसायला जुन्या स्कुटरसारखीच आहे. पण, त्याची बॅटरी आणि संरचनेत अनेक बदल आहेत. आता बॅटरी फ्लोअर बोर्डवर आहे. त्यामुळे स्टोरेज वाढलंय. त्याचबरोबर नवी बॅटरी, कंट्रोल सिस्टम आणि मोटार पॅनलचाही समावेश करण्यात आलाय. त्याचबरोबर सीटची लांबी देखील 80 मिमी वाढवण्यात आली आहे.

( नक्की वाचा : इंटरनेटशिवाय करा UPI Payment, फक्त एका कॉलवर होणार पैसे ट्रान्सफर! वाचा संपूर्ण पद्धत )
 

Chetak35Series मधील बॅटरी क्षमता 3.5kWh आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 153 किलोमीटरपर्यंत ही स्कुटर जाऊ शकते. इतकंच नाही तर ही बॅटरी 3 तासांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आलीय.

Advertisement

नव्या फिचर्समध्ये TFT टचस्क्रीन डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिविटी, इंटिग्रेटेड मॅप, आणि सेफ्टी अलर्टचा समावेश आहे. बजाज कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर या स्कुटरचं बुकिंग करता येईल.