मानसी पिंगळे, प्रतिनिधी
UPI (Unified Payments Interface) पेमेंटचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणतेही व्यवहार करताना रोख पैसे देण्याच्या ऐवजी ऑनलाईन पद्धतीनं, कॅशलेस पेमेंट करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलंय. UPI युझर्सना जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने पेमेंट करण्यासाठी NPCI ने (National Payments Corporation of India) अनेक महत्वाचे बदल केले आहेत. या बदलामुळे तुम्हाला UPI वापरणे अधिक सोपे होणार आहे.
UPI पेमेंट, ऑनलाईन पेमेंट करायचं म्हणटलं की, सर्वप्रथम मोबाईलमध्ये नेट, रिचार्ज असणं अतिशय गरजेचं आहे, असा सर्वांचा समज आहे. मात्र, आता ऑनलाईन पेमेंट करताना इंटरनेटची गरज लागणार नाही. इतकच नव्हे तर, स्मार्टफोनचीसुद्धा आवश्यकता नाही. केवळ एका कॉलवरून आता ऑनलाईन पेमेंट करणं शक्य होणार आहे.
इंटरनेटशिवाय ट्रान्सफर करा पैसे
एखाद्या व्यक्तीकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरी आता ऑनलाईन पेमेंट करणं, पैसे ट्रान्सफर शक्य होणार आहे. त्यामुळे आता इंटरनेटशिवायही यूपीआय पेमेंट करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) UPI123 पेद्वारे फीचर फोन आणि स्मार्टफोन युझर्ससाठी डिजीटल पेमेंट अधिक सोप झालं आहे. इंटरनेटशिवाय UPI123 पेद्वारे आता 10000 रुपयांपर्यत पेमेंट करणं शक्य होणार आहे.
( नक्की वाचा : New RBI Governor : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर Sanjay Malhotra कोण आहेत? )
UPI123 पेद्वारे इंटरनेटशिवाय पैसे ट्रान्सफर करण्याची संपूर्ण प्रक्रिया
- सर्वप्रथम 08045163666, 08045163581 आणि 6366200200 यांपैकी कोणत्याही एका IVR (Interactive Voice Response) नंबरला कॉल करा.
- कॉल केल्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
- तुम्हाल्या विचारल्यानुसार, तुमच्या बँक खात्याचं नावं सांगा.
- कुणाला पैसे पाठवायचेत त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा.
- सगळी अचूक माहिती सांगितल्यावर तुमच्या शेवटी UPI पिन सांगा. सगळी अचूक माहिती सांगितल्यावर तुम्ही ज्या व्याक्तीला पैसे पठवायचे आहेत त्यांना पैसे ट्रान्सफर होतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world