Bajaj Housing Finance IPO : नव्या आयपीओला अभूतपूर्व प्रतिसाद मिळण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेने एक अट घातली आहे. त्यानुसार वरच्या स्तरातील गैर बँकिंग वित्त कंपन्यांना सप्टेंबर 2025 पर्यंत वायदे बाजारामध्ये सार्वजनिक होणे अनिवार्य करण्यात आले आहे.  

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ (Bajaj Housing Finance IPO) 9 सप्टेंबरपासून सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. त्यापूर्वी स्थायी गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ खुला करण्यात आला होता. या कंपनीने स्थायी गुंतवणूकदारांसाठी 25.11कोटी समभाग खुले केले होते. 70 रुपयाला एक समभाग या दराने हे शेअर्स विक्रीसाठी खुले झाले होते. 104 स्थायी गुंतवणूकदारांचा याला उत्तम प्रतिसाद लाभला असून यातून स्थायी बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीने 1757 कोटी रुपये उभे केले आहेत. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या काळात सर्वसामान्य गुंतवणूकदार या आयपीओसाठी आपली बोली लावू शकतील. या आयपीओसाठीचा प्राईज बँड 66-70 रूपये असा ठेवण्यात आला आहे, म्हणजेच एखाद्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराची बोली यशस्वी ठरली आणि त्याला समभाग मिळाले तर त्यातील प्रत्येक समभागाचा दर हा 66 ते 70रुपयांच्या दरम्यान असेल. 

हे ही वाचा : आमीर खान, रणबीर कपूरसारख्या सेलिब्रिटींची या कंपनीत गुंतवणूक, तुम्हीही वापरले असतील कंपनीचे प्रॉडक्ट

बीएचएफएल (Bajaj Housing Finance Ltd) चे चेअरमन संजीव बजाज यांची एनडीटीव्ही प्रॉफिटने मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी म्हटले की गेल्या वर्षी एचडीएफसी कॉर्पोरेशन (HDFC Corp) आणि एचडीएफसी बँक  (HDFC  Bank) यांचा विलय झाला होता. ही घडामोड आमच्यासाठी सुवर्णसंधी निर्माण करणारी ठरली असे संजीव बजाज यांनी म्हटले. या विलयानंतर एचडीएफसी कॉर्पोरेशनमुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती आम्हाला भरून काढता येईल असे बजाज यांनी म्हटले. बजाज यांनी पुढे म्हटले की, एचडीएफसी ही बाजारातून रक्कम उभी करण्यासाठी अग्रणी असायची. विलयामुळे ही संघी आता आम्हाला चालून आली आहे. आयपीओबद्दल बोलताना बजाज यांनी म्हटले की, परिस्थिती आमच्यासाठी पूरक असून सद्यस्थितीचा फायदा उचलण्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. पुढच्या आठवड्यात या कंपनीचा आयपीओ येत असून याद्वारे कंपनीने 6560 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. येत्या काही वर्षात कंपनीने 12-14 टक्के वाढीचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले आहे. सध्या बाजारात असलेल्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्याचेही उद्दीष्ट्य कंपनीने डोळ्यासमोर ठेवले आहे. बजाज हा ब्रँड आमच्यासोबत असून आम्ही कर्ज घेण्याची मोठी क्षमता ठेवतो. आमच्या प्रतिस्पर्ध्यांची ही क्षमता मर्यादीत आहे कारण त्यांच्यासमोरील कर्ज घेण्याचे सगळे पर्याय संपत चालले आहेत.

Advertisement

हे ही वाचा : 21 व्या वर्षीच 3600 कोटींचे मालक असलेले कॉलेज ड्रॉप आऊट कैवल्य वोहरा कोण आहेत?

बीएचएफएल कंपनी अवघी 7 वर्षी जुनी आहे. मात्र तरीही आयपीओला मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व असल्याचे संजीव बजाज यांनी म्हटले आहे. आयपीओतून उभा राहणारा पैसा हा कंपनीच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करणे आणि कर्ज देण्याची क्षमता आणखी वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने एक अट घातली आहे. त्यानुसार वरच्या स्तरातील गैर बँकिंग वित्त कंपन्यांना सप्टेंबर 2025 पर्यंत वायदे बाजारामध्ये सार्वजनिक होणे अनिवार्य करण्यात आले आहे.    संजीव बजाज यांनी म्हटले की आम्ही यासाठी दीर्घकाळ थांबणे पसंत करणार नाही त्यामुळे आम्ही आताच ही प्रक्रिया पार पाडत आहोत. बजाज यांनी सांगितले की कंपनी व्यवस्थापनाकडे असलेल्या एकूण मालमत्तेचे मूल्य(AUM) हे 74100 कोटी रुपयांवरून 97000 कोटी रुपये इतके झाले आहे. आलिशान, मोठी घरे खरेदी करणाऱ्यांसोबतच विकासकांना कर्जपुरवठा करण्यावर ही कंपनी लक्ष्य केंद्रीत करण्याची योजना बनवत आहे.   

Advertisement
Topics mentioned in this article