Bank Holiday: बँक अलर्ट! तिसरा शनिवार आणि ईद, तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

Eid Bank Holiday Maharashtra: आरबीआयच्या अधिकृत कॅलेंडरनुसार ही माहिती समोर आली असून ग्राहकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या शहरातील बँका सुरू आहेत की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bank Holiday 21 March 2026:  शनिवारी बँका सुरु आहेत की नाही? याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.
मुंबई:

Bank Holiday 21 March 2026:  मार्च महिना म्हटला की आर्थिक वर्षाची गडबड आणि कामांचा डोंगर डोळ्यासमोर येतो. अशातच बँकांना असलेल्या सुट्ट्यांची माहिती नसेल तर ऐनवेळी तुमची महत्त्वाची कामे अडकू शकतात. शनिवारी, म्हणजेच 21 मार्च रोजी ईद-उल-फितर निमित्त देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आरबीआयच्या अधिकृत कॅलेंडरनुसार ही माहिती समोर आली असून ग्राहकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या शहरातील बँका सुरू आहेत की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.

21 मार्चला बँका बंद राहणार?

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी ईद आणि सरहुल या सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल यांसारख्या प्रमुख राज्यांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहील. याशिवाय मध्य प्रदेश, केरळ, आसाम, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, गोवा आणि चंदीगडमध्येही बँकांच्या शाखांना सुट्टी असेल. त्यामुळे धनादेश वटवणे किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावयाची कामे शनिवारी होऊ शकणार नाहीत.

Advertisement

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार )
 

या शहरांमध्ये बँकांचे कामकाज राहणार सुरू

देशभरात बहुतांश ठिकाणी सुट्टी असली तरी काही शहरांमध्ये मात्र बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत. आरबीआयच्या वेबसाइटनुसार कोची, शिमला आणि तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये 21 मार्च रोजी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे चालेल. या शहरांमधील नागरिक आपली बँकिंग कामे विना अडथळा पूर्ण करू शकतात.

मार्च महिन्यातील पुढील महत्त्वाच्या सुट्ट्या

मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बँकांमध्ये गर्दी असते. मात्र, याच महिन्यात पुढेही काही महत्त्वाच्या सुट्ट्या येणार आहेत. यामध्ये 26 मार्च रोजी राम नवमी निमित्त बँका बंद राहतील, तर 31 मार्च रोजी महावीर जयंती निमित्त बँकांना सुट्टी असेल. आर्थिक वर्ष संपत असल्याने थकीत कामे आणि व्यवहारांचे नियोजन नागरिकांनी या सुट्ट्या लक्षात घेऊनच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल सेवा आणि ऑनलाईन बँकिंग राहणार सुरू

बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरून जाण्याचे कारण नाही. एटीएम सेवा, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा 24 तास सुरू राहतील. तसेच एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस यांसारख्या फंड ट्रान्सफर सेवाही अखंडितपणे चालू असतील. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट ॲप्सचा वापर करून तुम्ही तुमचे दैनंदिन व्यवहार पूर्ण करू शकता. केवळ बँकेच्या शाखेशी संबंधित कामांसाठीच तुम्हाला पुढील कामकाजाच्या दिवसाची वाट पाहावी लागेल.
 

Topics mentioned in this article