जाहिरात

Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार

Pune News: गॅस सिलेंडर्सच्या टंचाईचे कारण पुढे करत पुण्यात हॉटेल चालकांनी आता थेट ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केल्याचा आरोप होत आहे.

Pune News: पुण्यात हॉटेलमध्ये जेवताय? जरा जपून, जेवणासोबत आता गॅसचेही पैसे मोजावे लागणार
Pune News : पुण्याच्या वानवडीमधील हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे.
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune News :  पश्‍चिम आशियामध्ये सध्या युद्धाचा भडका उडाला आहे आणि त्याचे चटके आता थेट तुमच्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचू लागले आहेत. युद्ध तिकडे सुरू आहे, पण त्याचा फटका पुण्यातील हॉटेलमध्ये जेवायला जाणाऱ्या सामान्य ग्राहकांना बसत असल्याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गॅस सिलेंडर्सच्या टंचाईचे कारण पुढे करत हॉटेल चालकांनी आता थेट ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून, बिलामध्ये अतिरिक्त चार्जेस लावले जात आहेत. नक्की काय आहे हा प्रकार आणि पुणेकर ग्राहक यामध्ये कसे भरडले जात आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हॉटेलच्या बिलावर चक्क गॅस चार्जेस

पुण्यातील वानवडी भागातील ग्रीन संपन्न हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या जगताप या ग्राहकाला आलेला अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी जेवण केल्यानंतर जेव्हा बिल मागवले, तेव्हा 1110 रुपयांच्या मुख्य बिलासोबत अजून एक बिल जोडलेले दिसले. त्या दुसऱ्या बिलावर अतिरिक्त 100 रुपये गॅस चार्जेस म्हणून आकारण्यात आले होते. हॉटेलमध्ये जेवणाच्या पदार्थांचे दर ठरलेले असताना, अशा प्रकारे वेगळे गॅस चार्जेस लावल्याने ग्राहक चक्रावून गेला आहे.

( नक्की वाचा : Sambhajinagar News: गॅस नाही म्हणून आता चुलीवर तयार होणार औषध; संभाजीनगरमधील उद्योजकांसमोर मोठे संकट )

गॅसचा तुटवडा की काळाबाजार?

जगताप यांनी  हॉटेलमधील वेटरकडे या अतिरिक्त बिलाबाबत विचारणा केली, तेव्हा मिळालेले उत्तर अधिकच धक्कादायक होते. पश्‍चिम आशियातील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाला असून सिलेंडर्स मिळत नाहीत, असे सांगण्यात आले. सिलेंडर्स मिळवण्यासाठी ते ब्लॅकने म्हणजेच चढ्या दराने विकत घ्यावे लागत आहेत आणि तो अतिरिक्त खर्च भागवण्यासाठी आता ग्राहकांकडून हे पैसे घेतले जात असल्याचे हॉटेल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

मात्र, एकीकडे सरकार गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगत असताना हॉटेलवाल्यांना सिलेंडर्स का मिळत नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

( नक्की वाचा : Pune News: ओळखीच्याच तिघांनी 15 वर्षांच्या मुलीला बनवलं शिकार, पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार )

ग्राहकांवर पडणार अतिरिक्त भुर्दंड

हॉटेलमध्ये जेवायला जाणाऱ्या सामान्य माणसाला आधीच महागाईचा फटका बसत आहे. त्यात आता युद्धाचे कारण सांगून अशा प्रकारे गॅस चार्जेस आकारले जात असतील, तर ग्राहकांनी न्याय कोणाकडे मागायचा? जर खरोखरच गॅसचा तुटवडा असेल, तर प्रशासनाने यावर स्पष्टीकरण का दिले नाही? आणि जर तुटवडा नसेल तर हॉटेल चालक हा भुर्दंड ग्राहकांवर का टाकत आहेत, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उभे राहिले आहेत. या सर्व प्रकारावर सरकारचा अंकुश का नाही, अशी विचारणा आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

सोशल मीडियावर संताप आणि चर्चा

या प्रकरणाबाबत तक्रार करणाऱ्या ग्राहकाने आपली व्यथा सोशल मीडिया पोस्टद्वारे मांडली आहे. त्यांनी शेवटी असा विचार केला की, हॉटेल चालकही एक व्यावसायिक आहे आणि जर सरकार त्यांना मदत करत नसेल, तर आपण तरी त्यांना सहकार्य करू या भावनेतून त्यांनी ते बिल भरले. मात्र, हा प्रश्न केवळ एका ग्राहकाचा नसून संपूर्ण पुणेकरांचा आहे. युद्धाच्या नावाखाली सुरू असलेला हा छुपा कर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणारा ठरत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com