Bank Holiday : मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बँका सुरू राहणार का बंद? सुट्ट्यांची यादी चेक करा!

सोमवारी, 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रातील बँकांचं काम सुरू होतं. 21 ऑक्टोबरला बँकांचं कामकाज सुरू असेल की बंद?

जाहिरात
Read Time: 2 mins

Bank Holiday Today: दिवाळीतील दिव्यांनी अख्खा देश उजळून निघाला आहे. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण. हा आनंदाचा, आयुष्य प्रकाशमान करणारा सणात आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार आहे. मात्र बँका सुरू असतील का नाही याबाबत गोंधळ (Banks Open Or Closed On October 21 For Laxmi Pujan) आहे.  प्रत्येक  राज्यांनुसार बँकांच्या सुट्ट्यांमध्ये बदल होत असतो. काही राज्यांमध्ये 20 ऑक्टोबरला बँक बंद आहेत तर काही राज्यांमधील बँका 21 ते 22 ऑक्टोबर हे दोन दिवस बंद असतील. 

महाराष्ट्रात काय असेल स्थिती? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीनुसार, सोमवारी, 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रातील बँकांचं काम सुरू होतं. 21 ऑक्टोबर, मंगळवारी दिवाळी अमावस्या, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी असेल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बँकेचे व्यवहार करण्याचं प्लानिंग असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रा व्यतिरिक्त मध्य प्रदेश, ओडिसा, सिक्कीम, मणिपूर, छत्तीसगड, जम्मू आणि श्रीनगर येथेही 21 ऑक्टोबरला बँका बंद असतील. जर तुम्ही या राज्यांमध्ये राहत असाल तर 21 तारखेला बँकेशी संबंधित कामं करू शकणार नाही. 

नक्की वाचा - NSE Holidays 2025: दिवाळीत शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? मुहूर्त ट्रेडिंग कधी असेल?

21 ऑक्टोबर बँका सुरू असतील?


22 ऑक्टोबर, बुधवार हा दिवस महाराष्ट्रात दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जात जातो. या दिवशीही महाराष्ट्रातील बँका बंद असतील. याचा अर्थ महाराष्ट्रात 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी बँका बंद असतील. याशिवाय गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही बँका बंद असतील. 

Advertisement

बँका बंद असल्याने व्यवहारासाठी कोणते पर्याय उपलब्ध?

बँका बंद असल्या तरी तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकता. मोबाइलमध्ये बँकेच्या अॅप्लिकेशनच्या मदतीने आर्थिक व्यवहार करू शकता. एटीएममधूनही पैसे काढता येऊ शकतं. याशिवाय नेट बँकिंग, युपीआय हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध असेल. जर तुम्हाला चेक वठवायचा असेल तर बँकेच्या जवळ असलेल्या एटीएममध्ये असलेल्या बॉक्समध्ये चेक टाकू शकता. (यावेळी सुरक्षितता तपासून घ्यावी) बँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर या बॉक्समधून चेक काढला जातो. अनेक बँकांकडे या सुविधा उपलब्ध असतात. तुमच्या बँकेकडून ही सुविधा दिली जाते की नाही ते एकदा तपासून घ्यावे.