Nirmala Sitharaman Budget Saree: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२०२७ सादर करणार आहे. अर्थमंत्री यंदा नववा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांची साडी नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या साडीत भारताच्या संस्कृतीची छाप पाहायला मिळते. यंदा अर्थमंत्र्यांनी हाताने विणलेली जांभळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली आहे. ही साडी तामिळनाडूच्या जुन्या परंपरेशी जोडलेली आहे. साडीवर हलक्या सोनेरी तपकिरी रंगाचे चेक्स आहेत, म्हणजेच कट्टम आणि कॉफी ब्राऊन बॉर्डरवर धाग्याचे काम आहे.
नक्की वाचा - Union Budget 2026 Live: अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत दाखल! थोड्याच वेळात मांडणार बजेट.. वाचा अपडेट्स
जांभळा रंग काय दर्शवतो?
जांभळा रंग महिला सक्षमीकरण, प्रतिष्ठा, न्याय आणि समानतेचे प्रतीक मानलं जातं. हा रंग आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि महिला हक्क चळवळीशी देखील जोडला गेला आहे. यावरून हे सूचित होतं की, हे बजेट महिलांसाठी विशेष योजना, शिक्षण, आरोग्य किंवा आर्थिक मदत यावर लक्ष केंद्रीत असेल.
मागील अर्थसंकल्पात 'मधुबनी' साडी नेसली होती
यापूर्वी, २०२५ च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारच्या 'मधुबनी' कलेने सजवलेली ऑफ-व्हाइट सिल्क साडी नेसली होती. ही साडी त्यांना पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी भेट दिली होती. या साडीवर माशांचं डिझाइन होतं. हे आनंद, समृद्धी आणि विकासाचं प्रतीक आहे.
निर्मला सीतारमण यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी तामिळनाडूच्या मदुरेमध्ये झाला होता. त्यानी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली. यानंतर जेएनयूमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं.