Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

सीतारमण यांनी अर्थ संकल्प सादर करताना काही वस्तूं वरचे कर कमी केले आहेत. त्यामुळे त्या आपोआप स्वस्त होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग नववा अर्थ संकल्प लोकसभेत सादर केला. अर्थ संकल्प सादर करताना सर्व सामान्यांना त्यांच्याकडून फार अपेक्षा होता. खास करू मध्यम वर्गाचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते. त्यातल्या त्यास सर्व सामान्यांचा आवडता विषय म्हणजे काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले यात जास्त रस असतो. शिवाय इन्कम टॅक्सकडे नोकरदारांचे लक्ष लागले असते. सीतारमण यांनी अर्थ संकल्प सादर करताना काही वस्तूं वरचे कर कमी केले आहेत. त्यामुळे त्या आपोआप  स्वस्त होणार आहेत. तर काहींवरचे कर वाढवले आहेत. त्यामुळे त्या वस्तू महाग होणार आहेत. यावरच आपण एक नजर टाकणरा आहोत. 

नक्की वाचा - Income Tax: आता उत्पन्न लपवलं तर जेल नाही; टॅक्स रिटर्नसाठीही मिळणार जास्त वेळ, वाचा बजेटमधील मोठे निर्णय

Advertisement

कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या? 
निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानुसार बीडी, बुटं, कपड्यांची निर्यात स्वस्त होणार आहे. या शिवाय CNG ही स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. जर या पुढे तुम्हाल परदेशवारी करायची असेल तर त्यावरील टॅक्स ही कमी केला आहे. त्यामुळे या पुढे परदेशी प्रवास ही स्वस्त होणार आहे. चामड्याच्या वस्तू ही स्वस्त होणार आहे. त्यांच्या निर्यातीवरूल कर कमी करण्यात आला आहे. शिवाय बायोगॅस, मायक्रोवेव्ह,ओवन हे ही स्वस्त होणार आहे. मोबाईलच्या किंमती ही कमी होणार आहे. विशेष म्हणजे विमानाचे पार्ट ही स्वस्त होतील. याशिवाय बॅटरी स्वस्त होतील. सर्वात महत्वाचे म्हणजे. सात गंभीर आजारांची औषधांच्या किंमती कमी होणार आहेत. डायबिटीजची औषधे ही कमी दरात या पुढे मिळतील. परदेशी शिक्षण ही स्वस्त झालं आहे. 

कोणत्या वस्तू महाग झाल्या?
महाग होणाऱ्या वस्तूमध्ये सर्वात वर आहे ते म्हणजे दारू. दारूवरचा टॅक्स वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात दारूचे दर वाढणार आहेत. या शिवाय सिगारेटवर ही कर लावण्यात आले आहे. त्यामुळे आपोआप सिगारेटच्या दरात ही वाढ झालेली पाहायला मिळेल. खनीजे आणि भंगार ही महाग होणार आहे. या अर्थसंकल्पातील सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्यूटी मधील कपात शिवाय दिलेल्या काही सवलतींमुळे या वस्तू आणि सेवांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. 

टॅक्सची स्थिती काय? 
या अर्थसंकल्पातून नोकरदारांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांची निराशा झाल्याचं चित्र आहे. इन्कम टॅक्समध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत. त्यामुळे गेल्या वेळ प्रमाणेच टॅक्स भरावा लागणार आहे. आयटी रिटर्नसाठी 1 जुलै ही मर्यादा ठेवण्यात आली आहे. शिवाय छोटे टॅक्स गडबडीसाठी पुढच्या काळात शिक्षा न करता त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. परदेशात अघोषीत संपत्तीसाठी ही यापुढे टॅक्स लावला जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजार कोसळल्याचं चित्र पहायला मिळाल आहे. 

स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी 

  • -CNG
  • -बीडी
  • -कपड्यांची निर्यात
  • -बुट
  • -परदेशी प्रवास
  • -बायोगॅस
  • -चामड्याची निर्यात
  • -ओवन 
  • -बॅटरी
  • - गंभीर आजारांची औषधे
  • -डायबिटीजची औषधे
  • -परदेशात शिक्षण घेणे

महाग झालेल्या वस्तूंची यादी 

  • - दारू 
  • -भंगार
  • - खनिजं