Dog Walker Income Business Idea: वाढती बेरोजगारी हे देशासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. हाताला काम नसल्याने देशातील तरुणवर्ग चिंतेत आहे. दुसरीकडे बदलती लाईफस्टाईल अन् तंत्रज्ञानामुळे कमाईचे नवनवे द्वार खुलत आहेत. अशातच महाराष्ट्रातील एका डॉग वॉकर तरुणाची तुफान चर्चा होत आहे. कारण हा तरुण फक्त कुत्र्यांना फिरवून लाखो रुपयांची कमाई करत आहे. काय आहे ही बिझनेस आयडिया? वाचा सविस्तर.....
Viral: नोकरी गेली तरीही घरबसल्या दर महिना दीड लाखांची कमाई, हे कसं शक्य आहे ?
डॉग वॉकर तरुणाची भन्नाट बिझनेस आयडिया (Dog Walker Income Story)
महाराष्ट्रातील एक कुत्र्यांना फिरवणारा तरुण सध्या चर्चेत आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याची कमाई, जी मोठ्या व्यावसायिकांना मागे टाकत आहे. हा तरुण दरमहा सुमारे 4.5 लाख रुपये कमवत आहे, तेही फक्त कुत्र्यांना फिरवून. या तरुणाची कमाई एमबीबीएस आणि एमबीए पदवीधारकांपेक्षाही जास्त आहे. आपल्या अनोख्या बिझनेस आयडियाने या तरुणाने हे सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम आणि आवड कोणत्याही पदवीपेक्षा कमी नाही.
टेलीचक्कर या पेजने याबाबतचा अहवाल दिला आहे. यानुसार, हा माणूस प्रत्येक कुत्र्याला दिवसातून दोनदा फिरण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये घेतो. हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. सध्या तो 38 कुत्र्यांची काळजी घेत आहे, जे शहरातील पॉश भागात राहणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या प्रेमींकडून येतात. सकाळ आणि संध्याकाळ फिरण्यासोबतच तो कुत्र्यांच्या तंदुरुस्ती आणि आरोग्य, आहाराची देखील काळजी घेतो. पाळीव कुत्र्यांचे मालक त्याच्या कामावर इतके खूश आहेत की त्याला मोठी मागणी आहे.
ही व्यक्ती कोण आहे?
कुत्रे फिरवून लाखो रुपये कमावणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप उघड झालेली नाही. विशेष म्हणजे कुत्र्यांना फिरवून लाखो रुपये कमावणाऱ्या व्यक्तीच्या भावाकडे एमबीएची पदवी आहे ज्यामुळे त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. तो महिन्याला 70,000 रुपये कमावतो मात्र दुसरीकडे कुत्र्यांना फिरवून त्याचा भाऊ महिन्याला4.50 लाख रुपये कमवत आहे.
कुत्र्यांना फिरवून पैसे कसा कमावतो?
वृत्तांनुसार, हा तरुण कुत्र्यांना फिरवून 15 हजार रुपये घेतो. दिवसातून दोन वेळा तो हे काम करतो. या तरुणाकडे सध्या 38 कुत्रे आहेत ज्यांची तो काळजी घेतो. हा डॉग वॉकर फक्त कुत्र्यांना फिरायला घेऊन जात नाही, तर त्यांच्यासोबत वेळ घालवतो, त्यांच्या गरजा पूर्ण करतो, काळजी घेतो. शहरात उच्चभ्रू भागात राहणारे लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी तडजोड करत नाहीत आणि म्हणूनच ते त्याच्या सेवेसाठी इतके पैसे देण्यास तयार असतात. तसेच त्याचे व्यवसाय मॉडेल इतके हुशार आहे की तो त्याचा वेळ आणि सेवा योग्यरित्या व्यवस्थापित करतो.
झोमॅटोच्या CEO नी खरेदी केलं अलिशान घर; 3.66 कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी भरली