
Deepinder Goyal's new home: झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल यांनी गुरुग्राममधील प्रीमियम निवासी प्रोजेक्ट डीएलएफ द कॅमेलियासमधील त्यांच्या अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंटची अधिकृत नोंदणी केली आहे.
दिपेंद्र गोयल यांनी हे अपार्टमेंट 52.3 कोटी रुपयांना खरेदी केले होते आणि त्याची नोंदणी 17 मार्च 2025 रोजी करण्यात आली होती. या नोंदणीवर त्यांनी 3.66 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. अपार्टमेंटचे एकूण कार्पेट एरिया 10,813 चौरस फूट आहे. यामध्ये पाच पार्किंग स्लॉटचाही समावेश आहे.
(नक्की वाचा- Rapido Bike Service : कोण आहेत 6700 कोटींची कंपनी 'रॅपिडो'चे मालक?)
या आलिशान घराचा व्यवहार मार्च महिन्यात पूर्ण झाला असला तरी, विकासकांकडून मूळ खरेदी 2022 मध्येच झाली होती. विशेष म्हणजे, या खरेदीच्या एक वर्षापूर्वी गोयल यांनी दिल्लीतील मेहरौली परिसरात 50 कोटी रुपयांना एक भूखंड देखील विकत घेतला होता.
डीएलएफ कॅमेलियाज कॉम्प्लेक्स गुरुग्राममधील सेक्टर 42 मध्ये गोल्फ कोर्सजवळ आहे. या कॉम्प्लेक्समध्ये 429 युनिट्स आहेत, ज्यात 4 BHK, 5 BHK किंवा 6 BHK अपार्टमेंट्सचा समावेश आहे. सध्या त्यांची किंमत 70 कोटी रुपयांपासून सुरू होते. या कॉम्प्लेक्समध्ये जिम, स्पा, क्लबहाऊस, ऑन-कॉल शेफ, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक यासह अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
(नक्की वाचा- Microsoft ने पाकिस्तानातील दुकान बंद केले, 9 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ)
कोण आहेत दीपेंद्र गोयल?
दीपेंद्र यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्ली येथून गणित आणि संगणक विज्ञान (Mathematics and Computing) या विषयात बी.टेक. पूर्ण केले. त्यांनी 2005 मध्ये पदवी प्राप्त केली. दीपेंद्र यांनी आपल्या करिअरची सुरुवात बेन कॅपिटल येथे सल्लागार म्हणून काम केले. येथे काम करताना त्यांना रेस्टॉरंटमधील मेन्यू डिजिटलायझेशनची गरज जाणवली. 2008 मध्ये त्यांनी पंकज चड्ढा यांच्यासोबत मिळून फूडिएबे नावाची वेबसाइट सुरू केली, जी नंतर 2010 मध्ये झोमॅटो बनली. झोमॅटो आज भारतातील आघाडीची फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट डिस्कव्हरी प्लॅटफॉर्म आहे, ज्याची मार्केट कॅप सुमारे 1.5 लाख कोटी रुपये आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world