कोका-कोला कंपनीसाठी आकारमानाच्या दृष्टीने भारत ही जगातील पाचवी मोठी बाजारपेठ आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोका-कोला आणि पेप्सिको यांच्यात युद्ध होतं. आता रिलायन्सने आपल्या कंपनीद्वारे कँपा कोला नव्याने बाजारात आणायचं ठरवलं आहे. यामुळे प्रस्थापितांनी किंमती घटवण्यास सुरुवात केली आहे.
नक्की वाचा : घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल? या स्टेप्स करा फॉलो!
'कोला' मार्केटमध्ये नव्या युद्धाला सुरुवात झाली आहे. कोका-कोला इंडियाने (Coca-Cola India) कँपा कोला या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी आणि कोला मार्केटवरील आपली पकड आणकी मजबूत करण्यासाठी किंमती घटविण्याचा निर्णय घेतला आहे. 400 मिलीलिटरच्या बाटल्यांमधून विकल्या जाणाऱ्या कोल्ड-ड्रींकची किंमत 5 रुपयांनी घटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाटल्यांमधील कोल्ड ड्रींक आता 20 रुपयांना मिळेल. याच किंमतीत कँपा कोला 500 मिलीलिटर कोल्ड ड्रींक देत आहे.
नव्या किंमती, अधिक कोल्ड ड्रींक
NDTV प्रॉफिटशी बोलताना 5 वितरकांनी सांगितले की कोल्ड ड्रींकच्या बाटल्यांवर लावण्यात येणारे स्टीकर्स बदलण्यात येत आहेत कारण नव्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू, तेलंगाणा, कर्नाटक आमि केरळमध्ये नव्या दरांचे स्टीकर्स असलेल्या बाटल्या विकण्यास लवकरच सुरुवात झालेली पाहायला मिळेल. सध्या उपलब्ध असलेल्या स्टॉकबाबत बोलायचे झाल्यास कंपन्यांनी नवे पॅकेजिंग केले असून याद्वारे ग्राहकांना 250 आणि 150 मिलिलिटर जास्त कोल्ड ड्रींक देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा :अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड
एका वितरकाने सांगितले की थम्स-अप, स्प्राईट, फँटा, लिम्कासारख्या कोल्ड ड्रींकची किंमतही वर नमूद केलेल्या किंमतीएवढीच करण्यात येणार आहे. नव्याने झाकण लावलेल्या 400 मिली.च्या बाटल्या 2-3 आठवड्यात बाजारात आलेल्या असतील. कोका-कोला कंपनीसाठी आकारमानाच्या दृष्टीने भारत ही जगातील पाचवी मोठी बाजारपेठ आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोका-कोला आणि पेप्सिको यांच्यात युद्ध होतं. आता रिलायन्सने आपल्या कंपनीद्वारे कँपा कोला नव्याने बाजारात आणायचं ठरवलं आहे. यामुळे प्रस्थापितांनी किंमती घटवण्यास सुरुवात केली आहे.
2022 साली कँपा कोलाने पुनरागमन केले होते. कँपाची 200 मिलीची बाटली 10 रुपयांना मिळते तर पेप्सीची 250 मिली.ची बाटली 20 रुपयांना मिळते. कोका-कोलाने 250 मिली.च्या आणि 20 रुपयांना मिळणाऱ्या कोल्ड ड्रींकच्या बाटल्यांचे उत्पादन बंद केले आहे. कोका-कोला एक स्वस्त पर्याय आणण्याच्या तयारीत आहे, मात्र याबाबतचा अधिक तपशील प्राप्त होऊ शकलेला नाही. कोका-कोलाची 2.25 लिटरच्या बाटलीपेक्षा सध्या कँपा कोलाची 2.25 लीटरची बाटली 20 रुपयांनी स्वस्त आहे.
'पेप्सिको' चीही बारिक नजर
कोका-कोलाप्रमाणेच पेप्सिकोने देखील बाजारातील घडामोडींवर बारिक नजर ठेवली आहे. स्पर्धेत टीकून राहण्यासाठी पेप्सिकोदेखील किंमती कमी करू शकते. नुकसान सोसावं लागलं तरी पेप्सिको यासाठी तयार असल्याचे कळते आहे. विक्री वाढवण्यासाठी पेप्सिको वितरकांना जास्त मार्जिन देण्याबाबत आणि अधिक प्रसिद्धी करण्याबाबत विचार करत आहे.