जाहिरात

Update Aadhar Card : घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल? या स्टेप्स करा फॉलो!

बऱ्याचदा आधार कार्डवरील डिटेल्स अपडेट करण्यासाठी आधारकेंद्र गाठल्यास, तेथे अवाढव्य रक्कम मागितली जाते. त्यापेक्षा घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता.

Update Aadhar Card : घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल? या स्टेप्स करा फॉलो!

बऱ्याचदा आधार कार्डवरील डिटेल्स अपडेट करण्यासाठी आधारकेंद्र गाठल्यास, तेथे अवाढव्य रक्कम मागितली जाते. त्यापेक्षा घरबसल्या आधार कार्ड अपडेट करा आणि जास्त पैसे मागितल्यास अशाप्रकारे तक्रार करा.

आधार कार्ड हे सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी महत्त्वाचे दस्ताऐवज आहे. अनेक सरकारी आणि खाजगी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अगदी शाळेत प्रवेश घेण्यापासून ते नोकरी मिळवणे, नवं बँक खातं उघडणं किंवा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर या सर्व कामांसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे जर आधार कार्डमध्ये एखादी चूक असेल तर अडचण येऊ शकते. म्हणून आधार कार्डवरील सर्व माहिती अचूक असणे गरजेचे आहे. यासाठी UIDAI ने 14 सप्टेंबर 2024 ही तारीख निश्चित केली होती. आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. आधार वापरकर्ते आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट मिळवू शकतात.  

मज्जाच मज्जा! नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये अल्पदरात दररोज मिळेल 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नक्की वाचा - मज्जाच मज्जा! नव्या प्रीपेड प्लॅनमध्ये अल्पदरात दररोज मिळेल 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) त्यांच्या सर्व आधार कार्ड धारकांना आधार अपडेट करण्याची सुविधा प्रदान करते. आता आधार कार्डवरील सर्व प्रकारची माहिती जसे की नाव, लिंग, मोबाइल नंबर, बायोमेट्रिक डिटेल्स ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अपडेट करता येईल. पण जर आधार कार्डवरील डिटेल्स अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर अवाढव्य रक्कम मागितली जात असेल तर, अशावेळी  uidai.gov.in वर मेल करुन किंवा 1947 या नंबरवर कॉल करुन तक्रार करता येईल. त्यामुळे आधार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. बायोमेट्रिक अपडेटसाठी फक्त 100 रुपये शुल्क भरावे लागेल. 

EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार

नक्की वाचा - EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार

जाणून घेऊया आधार कार्ड अपडेट कसे करावे...

सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधारकार्ड आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाने लॉग इन करायचे. 

आता लॉग इन करण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरवर आलेल्या OTP वापरून आधार अपडेट या पर्यायावर जा आणि प्राप्त झालेला OTP वापरा.

आधार अपडेट पर्यायावर जाऊन प्रोफाइल चेक करुन अपडेट करायचे तपशील निवडा.

ड्रॉपडउन मेन्यूमध्ये वरील तपशील बरोबर आहेत यावर क्लिक करा.

त्यानंतर आधार अपडेटशी संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करुन सबमिट करा.

Previous Article
नव्या SEBI प्रमुखांचा लवकरच सुरु होणार शोध, अर्थमंत्रालयातील सुत्रांची महत्त्वाची माहिती
Update Aadhar Card : घरबसल्या आधार कार्ड अपडेट कसं कराल? या स्टेप्स करा फॉलो!
Ratan Tata 10 thousand crores wealth what did Shantanu Naidu and his dog tito gets
Next Article
रतन टाटांच्या 10 हजार कोटींच्या संपत्तीतील शंतनू नायडूला काय मिळालं? प्रिय टीटोलाही विसरले नाही!