Commercial LPG Price Cut: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक क्षेत्रांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईत व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 41 रुपयांची घट झाली आहे. मुंबईत नव्या दरासह व्यावसायिक सिलेंडर 1714.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी ही किंमत 1755.50 रुपये होती.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 41 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर सिलेडर आता 1762 रुपयांना उपलब्ध होईल. तर पूर्वी त्याची किंमत 1803 रुपये होती. नवीन दर 1 एप्रिल 2025 पासून लागू झाले आहेत.
कोलकातामध्ये आधी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1913 रुपये होती, नव्या दरानंतर ही किंमत 1872 रुपये असणार आहे. चेन्नईत नवीन किंमतीनुसार व्यावसायिक सिलेंडर 1965 रुपयांना मिळणार आहे.
घरगुती एलपीजीच्या दरात बदल नाही
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत, मात्र घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर मुंबईत 802.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना उपलब्ध आहे.