Diwali 2025 Bank Holidays: लक्ष्मीपूजन ते भाऊबीज... बँकांना किती दिवस सुट्या? एका क्लिकवर जाणून घ्या

Diwali 2025 Bank Holidays List: पुढील आठवड्यात सोमवार ते गुरुवार (२० ते २३ ऑक्टोबर) या काळात ग्राहकांना आपल्या आर्थिक व्यवहारांचे (Financial Transactions) आगाऊ नियोजन करणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bank holiday for Dhanteras-Diwali: देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशात धनत्रयोदशीने (Dhanteras) सुरू होणाऱ्या पाच दिवसीय दिवाळी उत्सवाला (Diwali Festivities) आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. या सणासुदीच्या काळात दिवाळी लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, काली पूजा, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज (Bhaidooj) अशा विविध सणांसाठी देशातील अनेक राज्यांमध्ये बँका (Banks) बंद राहणार आहेत. त्यामुळे, पुढील आठवड्यात सोमवार ते गुरुवार (२० ते २३ ऑक्टोबर) या काळात ग्राहकांना आपल्या आर्थिक व्यवहारांचे (Financial Transactions) आगाऊ नियोजन करणे आवश्यक आहे. (Bank Holiday From 18th to 23rd October) 

पुढील आठवड्यात कधी कधी बँका बंद?

यावर्षी हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी २० ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, या प्रादेशिक सणांमुळे पुढील आठवड्यात बँकांच्या सुट्ट्यांमध्ये बदल दिसून येणार आहे. ग्राहकांना त्यांच्या स्थानिक शाखांच्या सुट्ट्यांची माहिती घेऊन बँकांना भेट देण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यातील २० ते २३ ऑक्टोबर या काळात बँका बंद राहणार आहेत. 

Check Your PF Balance: मिस कॉल द्या अन् पीएफ बॅलेन्स तपासा! 'हा' नंबर सेव्ह करून ठेवा

२० ऑक्टोबर: या दिवशी दिवाळी (Deepavali), नरक चतुर्दशी आणि काली पूजा निमित्त मणिपूर, महाराष्ट्र, ओडिशा, आणि जम्मू आणि काश्मीर वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.

२१ ऑक्टोबर: या दिवशी दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) निमित्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

Advertisement

२२ ऑक्टोबर: दिवाळी (बाली प्रतिपदा), विक्रम संवत नवीन वर्ष दिन, गोवर्धन पूजा आणि बलिपाड्यमी या सणांमुळे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.

२३ ऑक्टोबर: या दिवशी भाऊबीज (Bhai Dooj), चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/भ्रातृद्वितीया/निंगोल चाककुबा या सणांसाठी गुजरात, सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.

Advertisement

नक्की वाचा - BMC Diwali Bonus: पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी 'सुपर गोड'! प्रशासनाकडून मोठा बोनस जाहीर, वाचा सर्व तपशील

ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 सुट्ट्या 

दरम्यान, सणासुदीच्या हंगामामुळे ऑक्टोबर महिन्यात बँकांना एकूण २१ दिवस सुट्टी होती. यापैकी सुमारे १३ सुट्ट्या आठवड्याच्या दिवसांत (Weekdays) आल्या होत्या, तर उर्वरित सुट्ट्या शनिवार-रविवारच्या होत्या. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दर महिन्याला दुसरा आणि चौथा शनिवार तसेच सर्व रविवार बँकांना सुट्टी असते.