
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय सोपी आणि झटपट सुविधा उपलब्ध केली आहे. आता तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी वारंवार वेबसाइटवर लॉगिन करण्याची किंवा उमंग ॲप वापरण्याची गरज नाही. ईपीएफओने एक खास मोबाईल नंबर जारी केला आहे, ज्यावर फक्त मिस कॉल केल्यास तुमच्या पीएफ खात्याची संपूर्ण माहिती तुमच्या फोनवर उपलब्ध होईल.
पीएफ बॅलन्स तपासण्यासाठीचा नंबर
ईपीएफओने कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन 9966044425 हा नंबर जारी केला आहे. या नंबरवर तुम्ही फक्त एक मिस कॉल द्या. काही सेकंदांमध्येच तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस (SMS) येईल, ज्यात तुमचा पीएफ बॅलन्स आणि शेवटच्या योगदानाची माहिती असेल.
कुणाला वापरता येईल सुविधा
या सुविधेचा फायदा फक्त तेच कर्मचारी घेऊ शकतील, ज्यांचा मोबाईल नंबर ईपीएफओ रेकॉर्डमध्ये आधीच नोंदणीकृत आहे. म्हणजेच, मिस कॉल त्याच नंबरवरून करायचा आहे, जो तुमच्या पीएफ खात्याशी जोडलेला आहे.
ईपीएफओची ही नवीन सेवा खास करून त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही किंवा ज्यांना वारंवार पोर्टल आणि ॲपवर लॉगिन करायला आवडत नाही. यामुळे गाव, छोटे शहर किंवा कारखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी देखील एका मिस कॉलवर आपल्या पीएफ बॅलन्सची माहिती त्वरित मिळवू शकतील.
ईपीएफओचे म्हणणे आहे की, या सेवेचा उद्देश कर्मचाऱ्यांना जलद, सोपा आणि विनोद अडथळ्याचा मार्ग देणे आहे. जेणेकरून त्यांना छोट्या माहितीसाठी वेबसाइट किंवा ॲपवर वेळ वाया घालवावा लागणार नाही.
पीएफ बॅलन्स तपासण्यासाठीचे पर्याय
- जर तुम्हाला मिस कॉल सेवेचा वापर करायचा नसेल, तर ईपीएफओच्या इतर सेवांद्वारेही तुम्ही पीएफ बॅलन्स तपासू शकता:
- उमंग ॲप : या ॲपवर लॉगिन करून तुम्ही माहिती मिळवू शकता.
- ईपीएफओची वेबसाइट: ईपीएफओ पोर्टलवर यूएएन (UAN) आणि पासवर्ड वापरून लॉगिन करणे.
- एसएमएस सेवा : आपल्या मोबाईलमधून खालीलप्रमाणे एसएमएस टाईप करून 7738299899 या नंबरवर पाठवा.
ईपीएफओ वेळोवेळी आपल्या सेवांमध्ये बदल करत असते, जेणेकरून कर्मचाऱ्यांना जलद, विश्वासार्ह आणि सोपी सुविधा मिळू शकेल. या मिस कॉल सेवेमुळे आता कोट्यवधी कर्मचाऱ्यांना पीएफ बॅलन्स (PF Balance) जाणून घेण्यासाठी कोणत्याही त्रासातून जावे लागणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world