Doctors' salary : MBBS केल्यानंतर डॉक्टरांची सॅलरी किती असते हे पूर्णपणे त्यांच्या स्पेशलायजेशनवर अवलंबून असतं. जर तुम्हाला वाटत असेल की MBBS केल्यानंतर प्रत्येक डॉक्टर चांगले पैसे कमावतो, तर असं निश्चित सांगता येऊ शकत नाही. डॉक्टरांची सॅलरी त्यांनी कशात स्पेशलायजेशन केलंय यावर अवलंबून असतं.
याशिवाय त्यांनी सरकारी की खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस केलीये हे देखील तितकच महत्त्वाचं असतं. MBBS केल्यानंतर सर्वाधिक पैसे देणारं स्पेशलायजेशन कोणतं असतं आणि किती सॅलरी मिळते, जाणून घेऊया सविस्तर...
न्यूरोसर्जन (Neurosurgery)
न्यूरोसर्जन मेंदूच्या नसासंबंधित आजार आणि सर्जिकल उपचार करतात. न्यूरोसर्जनचा पगार खूप चांगला असतो. सुरुवातीच्या पगाराबद्दल सांगायचं झालं तर एक न्यूरोसर्जन साधारण २५ ते ४० लाख प्रतिवर्षाला कमावतो. तर अनुभवी डॉक्टरची १ ते ५ कोटी प्रतिवर्षाची कमाई आहे.
कार्डियोलॉजी (Cardiology)
कार्डियोलॉजीमध्ये (हृदयासंबंधित आजार) स्पेशलायजेशन करणारे डॉक्टरही चांगलं कमावतात. त्याची सुरुवातीची सॅलरी २५ चे ३५ लाख प्रतिवर्ष असतं. तर अनुभवी डॉक्टर वर्षाला ३ कोटींपर्यंत कमावतो.
ऑर्थोपेडिक सर्जरी (Orthopedic Surgery)
ऑर्थोपेडिक म्हणजे हाडांशी संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टरची सुरुवातीची वर्षाची सॅलरी १८ ते ३० लाख असते. तर अनुभवी डॉक्टर २ कोटींपर्यंत वर्षाला कमावतो.
प्लास्टिक सर्जरी (Plastic & Reconstructive Surgery)
सद्यस्थितीत प्लास्टिक सर्जरीकडे लोकांचा कल वाढत आहे. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठीचा खर्च लाखोंमध्ये असतो. तर प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या डॉक्टरची सॅलरी खूप जास्त असते. त्यांची सुरुवातीची सॅलरी २० ते ३५ लाख प्रतिवर्ष असतं. तर कॉस्मेटिक प्रॅक्टिससह १ ते ५ कोटींपर्यंत जाऊ शकते.
याशिवाय Gastroenterology (गॅस्ट्रोअँटरोलॉजी), Urology (यूरोलॉजी), Radiology (रेडियोलॉजी) आणि Dermatology (डर्मेटोलॉजी) मध्ये स्पेशलायजेशन करणारे डॉक्टरांनाही चांगली सॅलरी मिळते.