PF मधून पैसे काढणं झालं सोपं; केव्हा, किती वेळेस 100 % पैसे काढू शकता? उपचार-लग्न-शिक्षणाचे नियम काय आहेत?

EPFO PF Withdrawal Update 2026:EPFO नुसार, अनेकदा लोक वारंवार पैसे काढतात आणि निवृत्तीच्या वेळी त्यांच्याजवळ काहीच शिल्लक राहत नाही. 

जाहिरात
Read Time: 3 mins
New PF Withdrawal Rules 2026

प्रोव्हिडेंट फंड (PF) प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी मोठी बचत मानली जाते. मात्र गरज पडल्यानंतर हे पैसे काढणे कठीण होतं. अनेकदा नियम लक्षात येत नाही, तर छोट्या चुकीमुळे क्लेम रिजेक्ट होतो. या अडचणी दूर करण्यासाठी EPFO ने नियम अधिक सोपे बनवले आहेत. तुम्हालाही प्रोव्हिडेंट फंडमधून पैसे काढायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 

नोकरीच्या १२ महिन्यात पैसे काढण्याची सुविधा...

EPFO ने आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. ज्यामुळे आता पीएफ काढणं बँकेतून पैसे काढण्याइतकं सोपं झालं आहे. आता तुम्हाला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागणार नाही. तर केवळ १२ महिन्यांच्या नोकरीनंतर तुम्ही आपात्कालिन परिस्थितीत १०० टक्के पैसे काढू शकता. 

नक्की वाचा - ATM मधून पैसे काढणं झालं महाग, SBI ने शुल्क वाढवले; व्यवहाराचे नवे नियम जाणून घ्या!

वारंवार पैसे काढल्याने वृद्धावस्थेत मिळणाऱ्या पेन्शनवर परिणाम होईल? एका वर्षात किती वेळेस पैसे काढू शकता? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...

Advertisement

नोकरदारवर्गाला मोठा दिलासा...

जुन्या प्रणालीत पीएफचे पैसे काढण्यासाठी विविध ठिकाणी १३ प्रकारचे नियम होते. पैसे काढण्यासाठी दोन वर्षे नोकरी आवश्यक होती. तर अनेकदा पाच किंवा सात वर्षांची प्रतीक्षा करावी लागत होती. आता EPFO ने हे सर्व नियम एकत्रित केले आहेत. 


१०० टक्के पैसे कधी काढू शकता?

नव्या नियमांनुसार, पीएफमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतो. काही खास वेळेत तुम्ही १०० टक्के पैसेही काढू शकता. कधी मिळते ही सुविधा? 

Advertisement

१ आजारपणात  - स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्यांवर वैद्यकीय उपचार करावयासे असल्यास वर्षभरात तीन वेळेस पैसे काढू शकता. 
२ मुलांचं शिक्षण - स्वत:चं शिक्षण किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही नोकरीदरम्यान दहा वेळा पैसे काढू शकता. 
३ लग्न - स्वत:चं किंवा मुलं-भाऊ-बहिणीच्या लग्नासाठी तुम्ही पाच वेळा पैसे काढू शकता. 
४ घर आणि जमीन - घर खरेदी करणं किंवा उभं करण्यासाठी पाच वेळा पैसे काढण्याची सुविधा आहे. 
५ कोणत्याही कारणाशिवाय वर्षातून दोन वेळा पैसे काढू शकता. 

पीएफमधील उरलेले २५ टक्के पैसे कधी काढू शकता? 

EPFO नुसार, अनेकदा लोक वारंवार पैसे काढतात आणि निवृत्तीच्या वेळी त्यांच्याजवळ काहीच शिल्लक राहत नाही. 

आकडेवारीनुसार, ७५ टक्के टोकांजवळ भविष्यासाठी ५० हजार रुपयेही शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे ७५ टक्के पैसे काढण्याचा नियम आहे. उरलेले २५ टक्के रक्कम निवृत्तीच्या वेळी उपयोगी पडते. 

Advertisement

नोकरी गेल्यानंतरही १ वर्षापर्यंत तुम्ही बेरोजगार राहत असाल तर उरलेले २५ टक्के पैसे काढू शकता. 

पेन्शनवर परिणाम होईल? 

पीएफ काढण्याच्या या नव्या नियमांमुळे तुमच्या पेन्शनवर कोणताही परिणाम होणार नाही. जर तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी करत असाल. तर तुम्ही तुमचे पेन्शन काढू शकता. जर तुम्ही आधीच १० वर्षे सेवा पूर्ण केली असेल, तर तुमचे पेन्शन काढण्याचं टाळणे शहाणपणाचे आहे, कारण निवृत्तीनंतर तुम्हाला एक निश्चित मासिक पेन्शन मिळेल.

पीएफमध्ये पैसे ठेवण्याचा मोठा फायदा...

पीएफवर सध्या ८.२५ टक्क्यांचं व्याज दिलं जात आहे. जर तुम्ही पैसे काढले नाहीत, तर चक्रवाढीमुळे तुमची छोटी रक्कम काही वर्षांत मोठी होऊ शकते. म्हणून, अगदी आवश्यक असेल तरच पैसे काढा.