अलिकडेच भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 500 रुपयांच्या बनावट नोटांबाबत अलर्ट जारी केला होता. अर्थ मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, बाजारात पुन्हा एकदा बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक प्रकरणे 500 रुपयांच्या नोटांबाबत समोर आली आहेत. अशा अनेक खोट्या नोटा पकडल्या गेल्या आहेत. ज्या हुबेहूब अस्सल नोटांसारख्या दिसतात. हे पाहता सरकारने जनतेला आवाहन केले आहे की, प्रत्येक रोख व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगावी. शिवाय नोट तपासावी असं ही सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या बनावट नोटांची सर्वात मोठी अडचण ही आहे की त्या बहुतेक वेळा अस्सल नोटांसारख्याच दिसतात. त्यामुळे घाईगडबडीत त्या खऱ्या वाटू शकतात. म्हणून, RBI आणि अनेक सायबर-क्राईम शाखांने काही सल्ले दिले आहेत. ज्यांच्या मदतीने नोटेची खरी ओळख पटवता येते. यापैकी अनेक पद्धतींचा वापर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने देखील करू शकता.
महात्मा गांधींचा फोटो आणि वॉटरमार्क तपासा
500 रुपयांच्या अस्सल नोटेवर महात्मा गांधींचा फोटो स्पष्ट आणि तीक्ष्ण असतो. प्रकाशात पाहिल्यास तुम्हाला वॉटरमार्कमध्ये गांधीजींची प्रतिमा आणि '500' लिहिलेले दिसेल. बनावट नोटांमध्ये हा भाग बहुतेक वेळा फिकट किंवा गडबडलेला असतो.
रंग बदलणारी संख्या
नोटेला थोडा तिरकं करून पाहा, जर '500' ही संख्या हिरव्या रंगातून निळ्या रंगात बदलत नसेल, तर नोट बनावट असू शकते. ही इंक केवळ अस्सल नोटेमध्ये वापरली जाते.
सुरक्षा धागा आणि इंटाग्लिओ प्रिंट
नोटेच्या मध्यभागी जी चंदेरी रेषा असते, त्यावर 'भारत' आणि 'RBI' लिहिलेले असते. जे प्रकाशात पाहिल्यास दिसते. तसेच, गांधीजींचा फोटो आणि काही मजकूर उठावदार असतो, ज्याला हाताने स्पर्श करून पाहाता येवू शकेल.
मायक्रो लेटरिंग आणि नंबर अलाइनमेंट
नोटेच्या खाली अतिशय लहान अक्षरात “RBI” आणि “500” लिहिलेले असते, जे कॅमेऱ्याच्या झूममधून पाहिले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, अनुक्रमांक एका बाजूने लहान आणि दुसऱ्या बाजूने मोठा असतो, बनावट नोटेत हा फरक बहुतेक वेळा दिसत नाही.
RBI चे 'MANI' ॲप वापरा
RBI ने 'MANI' (Mobile Aided Note Identifier) नावाचे एक ॲप लाँच केले आहे, जे नोट स्कॅन करून देते. हे ॲप विशेषतः दृष्टिबाधित लोकांसाठी तयार केले आहे, पण सामान्य वापरकर्तेही याचा वापर करून नोट ओळखू शकतात. शिवाय बनावट नोट पकडण्यासाठी नाही, पण जर ॲप वारंवार नोट ओळखण्यात अयशस्वी ठरत असेल, तर शंका घेणे आवश्यक आहे.
स्मार्टफोन कॅमेरा आणि फ्लॅशने करा त्वरित तपासणी
जर तुमच्याकडे हाय-रिझोल्यूशन कॅमेरा असलेला स्मार्टफोन असेल, तर तुम्ही नोट झूम करून मायक्रो टेक्स्ट, अलाइनमेंट आणि प्रिंटिंग क्वालिटी सहजपणे तपासू शकता. तसेच, फ्लॅश चालू करून सुरक्षा धागा किंवा काही हायलाइटिंग फीचर्सची तपासणी करता येते.
नक्की वाचा - Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?
गॅलरीमधून तुलना करा
जर तुम्हाला शंका असेल, तर RBI च्या वेबसाइटवर किंवा अधिकृत मार्गदर्शिकेत दिलेल्या अस्सल नोटेच्या फोटोसोबत तुमच्या नोटेची तुलना करा. बहुतेक बनावट नोटांमध्ये काहीतरी तपशील गहाळ असतो किंवा वेगळा असतो, जसे की रंगाची टोन, अंतर किंवा फॉन्ट. सरकारने हे देखील म्हटले आहे की कोणत्याही संशयास्पद नोटेची माहिती त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा बँक शाखेला द्या. तसेच, असंघटित स्त्रोतांकडून जसे की स्थानिक दुकानदार, फुटपाथ विक्रेते किंवा रोख जमा करताना विशेष लक्ष ठेवा.