1 मार्चपासून सुरु होणाऱ्या नव्या महिन्यात अनेक महत्त्वाचे बदल होणार असून त्याचा परिणाम तुमच्या रोजच्या आयुष्यावर होणार आहे. LPG सिलेंडर्सच्या किंमती, फिक्स डिपॉझिटचे दर, नॉमिनेशन, कर समायोजन तसंच GST याबाबतचे महत्त्वाचे बदल नव्या महिन्यात होणार आहेत. त्याचे परिणाम 1 मार्च 2025 पासून होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1 मार्चपासून कोणते बदल होणार?
SEBI चे नवे नियम
म्युचअल फंड फोलिओ आणि डिमॅक अकाऊंटच्या नामनिर्देशन प्रक्रियेत सुधारणार करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) नवे मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत. 1 मार्च 2025 पासून लागू होणारे नियमांमुळे गुंतवणूकदारांच्या आजारपणात किंवा मृत्यूनंतर मालमत्त्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
गुंतवणुकदारांना हे नियम माहिती हवेत
गुंतवणूकदार आता म्युचअल फंड तसंच डिमॅट अकाऊंटसाठी 10 जणांना नामनिर्देशत करु शकतात.
एकल धारक खातेदारांना नॉमिनी निश्चित करणे अनिवार्य असेल. दावा न केलेल्या मालमत्तेच्या घटना टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये गुंतवणूकदारांनी पॅन, आधार (शेवटचे चार अंक) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांकासह तपशीलवार नामनिर्देशित माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.
संयुक्त खात्यांमध्ये, संपत्ती हयात असलेल्या खातेधारकांना सर्व्हायव्हरशिप नियमांतर्गत आपोआप हस्तांतरित केली जाईल.
( नक्की वाचा : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई बनली देशातील पहिल्या क्रमांची वीज कंपनी! ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब )
LPG सिलेंडर्सची किंमत
दर महिन्याच्या एक तारखेला इंधन कंपनीकडून LPG सिलेंडर्सच्या नव्या किंमती जाहीर केल्या जातात. 1 मार्च देखील त्याला अपवाद नाही. LPG सिलेंडर्सच्या सुधारित किंमती 1 तारखेला सकाळी 6 वाजता जाहीर होतील. एअर टर्बाइन इंधन, CNG आणि PNG च्या किंमती देखील 1 तारखेला अपडेट होतील.
फिक्स डिपॉझिट्सचे दर
1 मार्चपासून काही बँका त्यांच्या मुदत ठेवीच्या (फिक्स डिपॉझिट) सुधारित किंमती जाहीर करु शकतात. नुकतेच काही बँकांनी त्यांच्या FD दराचे समायोजन केले आहे. त्याचप्रकारचे बदल मार्च 2025 मध्ये दिसू शकतात. त्याचा तुमच्या खिशांवर परिणाम होऊ शकतो.
विमा प्रीमियमसाठी बदलण्यासाठी UPI पेमेंट नियम
1 मार्च 2025 पासून, UPI वापरकर्ते Bima-ASBA सुविधेअंतर्गत ब्लॉक केलेल्या रकमेद्वारे विमा प्रीमियम भरू शकतात. यामुळे पॉलिसीधारकांना विमा पेमेंटसाठी निधी ब्लॉक करता येईल. तसेच पॉलिसी स्विकारल्यानंतरच वेळेवर पेमेंट करणे सुनिश्चित होईल. विमा कंपनीने प्रस्ताव नाकारल्यास, ब्लॉक केलेली रक्कम अनब्लॉक केली जाईल.
कर समायोजन आणि करदात्यांना दिलासा
करसंबंधित अनेक बदल 1 मार्च 2025 पासून लागू होतील. करदात्यांना दिला देणारे टॅक्स स्लॅब आणि TDS (टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स) मर्यादेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
GST पोर्टल सुरक्षा सुधारणा
जीएसटी पोर्टल आता मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनसह अधिक सुरक्षित होईल. नवीन सुरक्षा उपायांचे पालन करण्यासाठी व्यवसाय मालकांना त्यांच्या IT प्रणाली अपडेट करणे आवश्यक आहे.