'भारतासारख्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, जगात कुठेही नाहीत!' गौतम अदाणींनी सांगितलं कारण

लखनऊमधील  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management) येथे बोलताना अदानी यांनी आधार, यूपीआय (UPI) आणि ओएनडीसी (ONDC) या प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:


भारतामधील सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा या जगात अतुलनीय आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या वेगाने कोणत्याही देशाने इतकी शक्तिशाली आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञान रचना (technology stack) तयार केलेली नाही, असे मत अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी व्यक्त केले आहे. लखनऊमधील  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management) येथे बोलताना अदानी यांनी आधार, यूपीआय (UPI) आणि ओएनडीसी (ONDC) या प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला. भारताला 2050 पर्यंत 25 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी हे प्लॅटफॉर्म महत्त्वाचे ठरतील असे त्यांनी सांगितले. 

आयआयएम-एल (IIM-L) च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपण जे काही उभारले आहे, ते कोणत्याही देशाने उभारले नाही.” त्यांच्या भाषणात वैयक्तिक अनुभव, आर्थिक दृष्टीकोन आणि तात्विक चिंतन यांचा संगम होता. "हे केवळ प्लॅटफॉर्म नाहीत, तर हे एका नवीन भारताचे प्रक्षेपण मंच आहेत. एक असा भारत जो मुलतः सर्वसमावेशक आणि मूळतः प्रगतीशील आहे, '' असे अदाणी यांनी स्पष्ट केले. 

अदाणी यांनी हे वक्तव्य  एका मोठ्या विषयाच्या संदर्भात आले आहे - तो म्हणजे, भारत आता अशा टप्प्यात प्रवेश करत आहे जिथे बदलाची साधने अखेर भारतीयांच्या हातात आहेत. अदानी यांनी चार संरचनात्मक फायदे (structural advantages) सांगितले. तरुण आणि महत्त्वाकांक्षी लोकसंख्या, वेगाने वाढणारी देशांतर्गत मागणी, अभूतपूर्व डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भारतीय उद्योजकांना तातडीने आणि मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या देशांतर्गत भांडवलाची नवीन लाट देशाच्या विकााला गती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

अदाणींच्या वक्तव्याचा अर्थ काय?

भारताचा डिजिटल स्टॅक (digital stack) एक सॉफ्ट पॉवर (soft power) मालमत्ता म्हणून अधिकाधिक पाहिला जात असताना, भारतीय उद्योगपतींची ही टिप्पणी आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक बँकेने (World Bank) भारताच्या डीपीआयला (DPI) "एक अद्वितीय यशोगाथा" असे वर्णन केले आहे. . आफ्रिका ते लॅटिन अमेरिकेपर्यंत अनेक विकसनशील अर्थव्यवस्था आता भारताचे मॉडेल स्वीकारण्याचा विचार करत आहेत.

Advertisement

परंतु गौतम अदानी यांचे मत केवळ धोरणात्मक कौतुकापलीकडचे होते. त्यांच्या मते, डिजिटल पायाभूत सुविधा केवळ सार्वजनिक क्षेत्रातील सुधारणा किंवा फिनटेक (fintech) नवोपक्रमांबद्दल नाहीत. तर त्या अशा भारताचा पाया घालण्याबद्दल आहेत, जो नवनिर्मिती करतो, कॉपी करत नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, “हा तुमचा क्षण आहे. भारत हे एक कॅनव्हास आहे. तुम्ही ज्या चौकटींचा अभ्यास करता त्या उपयुक्त आहेत, पण त्या भूतकाळावर आधारित आहेत. भविष्य त्या लोकांचे नसेल, जे सुरक्षित खेळ खेळतात. तर ते त्यांचे असेल, जे शक्यतांचा पुरेपूर वापर करतात,'' असे अदाणी यांनी सांगितले. 

इंग्रजी आणि हिंदीच्या मिश्र भाषेत दिलेले हे भाषण केवळ डिजिटल साधनांपुरते मर्यादित नव्हते. अदानी यांनी त्यांच्या स्वतःच्या घडलेल्या अनुभवांबद्दल सांगितले - वयाच्या 16 व्या वर्षी मुंबईत डायमंड ट्रेडिंग डेस्क चालवण्यापासून ते 'बांधता न येणारे' म्हणून तज्ज्ञांनी वर्णन केलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यापर्यंत. मुंद्रा, खावडा, ऑस्ट्रेलिया आणि धारावी या प्रत्येक कथेबद्दल ते म्हणाले की, हे सावधगिरीपेक्षा दृढनिश्चयाचे (conviction over caution), आरामापेक्षा परिणामाचे (consequence over comfort) आणि अनुरूपतेपेक्षा निर्मितीचे (creation over conformity) उत्पादन आहे.

Advertisement

एका क्षणी, या दूरदर्शी उद्योजकाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले: “नकाशा (Maps) तुम्हाला तिथेच घेऊन जाईल जिथे कोणीतरी आधीपासूनच गेले आहे. परंतु खरोखरच काहीतरी नवीन तयार करण्यासाठी, तुम्हाला शक्यतेकडे निर्देश करणारा होकायंत्र (compass that points to possibility) आवश्यक आहे.” .

भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या विषयावर परत येताना, अदाणी म्हणाले की हा केवळ आर्थिक प्रवेगाचा क्षण नाही, तर नैतिक स्पष्टतेचा क्षण (moment of moral clarity) आहे. “ज्या जगात युद्धामुळे फूट पडली आहे आणि वर्चस्वाच्या भुकेमुळे फाटले आहे, तिथे भारत आपल्या संयमामुळे (restraint) उंच उभा आहे,” ते म्हणाले. “जेथे इतर लादतात, तेथे भारत उत्थान करतो. जिथे इतर घेतात, तिथे भारत शांतपणे, सातत्याने आणि सन्मानाने देतो.”

Advertisement

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)

Topics mentioned in this article