Gold Rate Today : भारतीय बाजारात सोन्याच्या दरात 8 जुलै 2025 रोजी मोठी वाढ दिसून आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 550 रुपयांनी वाढला असून, तो प्रति ग्रॅम 9,884 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच प्रतितोळ सोने 98,840 रुपयांवर पोहोचले आहे.
मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. परंतु 8 जुलै रोजी त्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे 500 रुपयांनी वाढून 90,600 रुपये झाला, तर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळे 410 रुपयांनी वाढून 74,130 रुपये झाला आहे.
प्रमुख शहरातील सोन्याचे दर (प्रतितोळे)
- मुंबई- 98,840 रुपये
- पुणे - 98,840 रुपये
- नागपूर- 98,840 रुपये
- नाशिक- 98,870 रुपये
- छत्रपती संभाजीनगर- 98,840 रुपये
सोन्याच्या दरात वाढ होण्याचं कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार शुल्कांच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत 1 ऑगस्टपर्यंत वाढवल्यानंतर गुंतवणूकदारांच्या भावनांमध्ये सुधारणा झाली होती. जागतिक आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला अजूनही 'सुरक्षित गुंतवणूक' मानले जाते, ज्यामुळे त्याच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.
2025 च्या सुरुवातीपासून भारतात सोन्याच्या दरात 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्याच्या वाढीमुळे सोन्याच्या दरात चढउतार होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे खरेदीची संधी उपलब्ध होईल. चांदीच्या दरातही वाढ अपेक्षित आहे.
एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण
जागतिक स्तरावर सोन्याचे दर स्थिर असले तरी, स्पॉट गोल्ड 3,334 प्रति डॉलर औंस आणि अमेरिकन गोल्ड फ्युचर्स 3,344.20 डॉलरवर होते. मात्र MCX सोन्याचे दर आज 97,172 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खाली उघडले, जे मागील बंद भावापेक्षा 97,270 रुपये कमी होते.