मंगेश जोशी, जळगाव
सोने-चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बाजारात सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सातत्याने सुरूच असून आज या किमतीत मोठी कपात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज एकाच दिवसात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीचा दरही तब्बल 4000 रुपयांनी खाली आला आहे.
पाच दिवसांत झालेली एकूण घसरण आणि आजचे दर
गेल्या 5 दिवसांचा विचार केला असता, सोन्या-चांदीच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. 5 दिवसात सोन्याच्या घरात 3 हजार 700 रुपयांची तर चांदीच्या दरात 12 हजार रुपयांची घसरण, गेल्या 5 दिवसांत सोन्याचे दर 4 हजार रुपयांनी तर चांदीचे दर 12 हजार रुपयांनी कमी झाले आहेत. आज बाजारात जीएसटी (GST) लागू न करता सोन्याचे दर 1 लाख 53 हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर प्रति किलो 2 लाख 62 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
(नक्की वाचा- Pimpri Chinchwad: प्रियकराची प्रेयसीला अमानुष मारहाण; पोलिसांनी तरुणीला गाठलं पण भलताच ट्विस्ट आला समोर)
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होताना दिसत आहे. अमेरिका इराण यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याने परिणामी सोन्या-चांदीतील गुंतवणूक घटली असून यामुळे सोन्या चांदीचे भाव कमी होत असल्यास चा अंदाज सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.
का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?
जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम भारतामधील सराफा बाजारावर होताना दिसत आहे. सराफा व्यावसायिकांनी आणि अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी आणि राजकीय संघर्ष कमालीचा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या या युद्धाच्या परिस्थितीमुळे आणि अनिश्चिततेमुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीमधील आपली गुंतवणूक लक्षणीयरीत्या घटवली आहे. गुंतवणूकदारांनी आपला निधी इतर सुरक्षित पर्यायांकडे वळवल्यामुळे सोन्या-चांदीच्या मागणीत घट झाली असून, परिणामी जागतिक आणि देशांतर्गत बाजारात भाव झपाट्याने खाली येत आहेत.
जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिरतेचे वातावरण निर्माण होत नाही, तोपर्यंत मौल्यवान धातूंच्या किमतींमधील ही अस्थिरता अशीच सुरू राहू शकते, असा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.