तुम्ही किती सोनं घरी ठेवू शकता? विक्रीनंतर टॅक्स लागतो का? वाचा नियम

Gold Storage Rule In India: भारत सरकारच्या नियमानुसार आपल्या देशात सोनं घरी ठेवण्याची एक निश्चित मर्यादा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Gold Storage Rule In India : तुम्ही निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोनं ठेवलं तर काय होईल?
मुंबई:

Gold Storage Rule In India: आपल्या देशात सोनं खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे. आपल्या देशात सोन्याचं फक्त गुंतवणूक (Gold Investment) म्हणून नाही तर परंपरा म्हणूनही मोठं महत्त्व आहे. त्यामुळे कोणत्याही शूभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. सोनं हा फक्त दागिना नाही तर अडचणीच्या वेळी कामाला येणारा ऐवज आहे. सुरक्षेचा विचार करुन अनेक जणं सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात.

किती सोनं घरी ठेवता येतं? मर्यादेपेक्षा जास्त सोनं खरेदी केलं तर काय होतं? सोनं विकल्यानंतर टॅक्स लागतो का? या सर्व प्रश्नांची आम्ही तुम्हाला उत्तर देणार आहोत. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

घरी सोनं ठेवण्याची मर्यादा (Gold limit per person in India)

भारत सरकारच्या आयकर नियमानुसार (Income Tax Rules) सोनं घरामध्ये ठेवण्याची मर्यादा  (Gold Storage Limit in India) निश्चित करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी मर्यादा आहे.  CBDT (Central Board of Direct Taxes)  नियमानुसार तुम्ही घरी एका मर्यादेपर्यंतच सोनं ठेवू शकता. निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सोनं ठेवलं तर तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागेल. तुमच्याकडं सोनं खरेदी करण्याची पावती असणे आवश्यक आहे. 

महिला किती सोनं ठेवू शकतात?

आयकर नियमानुसार, विवाहित महिला स्वत:कडं 500 ग्रॅम सोनं ठेवू शकतात. तर अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा 250 ग्रॅम आहे. तर पुरुषांना फक्त 100 ग्रॅम सोनं ठेवण्याची परवानगी आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा )
 

वारसा हक्कातून मिळालेल्या सोन्यावर टॅक्स लागतो?

तुम्ही करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री सोनं खरेदी केलं असेल किंवा ते तुम्हाला वारसा हक्कानं मिळालं असेल तर त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. नियानुसार निश्चित मर्यादेमध्ये मिळालेल्या सोन्याची दागिने सरकारला जप्त करता येत नाहीत. पण, मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर तुम्हाला त्याची पावती दाखवावी लागेल.

सोनं विकल्यावर टॅक्स लागतो?

घरामध्ये सोनं ठेवल्यानंतर त्यावर कोणताही टॅक्स  (Tax on Gold Jewellery Holdings) द्यावा लागत नाही. पण, तुम्ही सोनं विकलं तर त्यावर टॅक्स द्यावा लागेल. तुम्ही 3 वर्षांपर्यंत सोनं स्वत:कडं ठेवून त्याची विक्री केली तर त्यामधून होणाऱ्या नफ्यात 20 टक्क्यांपर्यंत लाँग टर्म कॅपिटल टॅक्स  (LTCG) द्यावा लागेल. 

Advertisement

( नक्की वाचा : दागिने की डिजिटल सोनं, सोन्याच्या गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय बेस्ट? )
 

तुम्ही गोल्ड बॉँडची (SGB) 3 वर्षांच्या आत विक्री केली तर त्यामधून होणारा नफा तुमच्या उत्पन्नामध्ये जमा होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कराच्या हिशेबाने त्यावर टॅक्स द्यावा लागेल. तुम्ही 3 वर्षानंतर गोल्ड बाँडची विक्री केली तर त्यावरील नफ्यात 20 टक्के इंडेक्सेशन आणि 10 टक्के बिना इंडेक्सेशन टॅक्स लागतो. पण, तुम्ही गोल्ड बॉन्डची मॅच्युरिटी पूर्ण झाली तर त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही.