जीएसटी काउन्सिलची 55 वी बैठक राजस्थानच्या जैसलमेर येथे पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. विविध राज्यांचे अर्थमंत्री देखील उपस्थित होते. हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स, लक्झरी प्रोडक्ट्स यावरील जीएसटीबाबत या बैठकी चर्चा झाली.
जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवावा अशी मागणी करण्यात येत होती. आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल असे अपेक्षित होते. मात्र याबाबतचा निर्णय यंदाच्याही बैठकीत झाला नाही.
सेंकड हँड कार महागणार
सेकंड हँड इलेक्ट्रिक कार आणि लहान पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवरील जीएसटी दरात वाढ करण्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या कार खरेदीसाठी देखील ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावा लागणार आहेत. जुन्या आणि वापरलेल्या इलेक्ट्रिक कार आणि लहान पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवरील जीएसटी 12 टक्क्यावरुन 18 टक्के करण्यात आला आहे.
जीएसटी काऊन्सिल बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- जुन्या आणि वापरलेल्या ईव्ही आणि लहान पेट्रोल आणि डिझेल कारच्या विक्रीवर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. सध्याचा दर 12 टक्के आहे.
- लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटीमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला.
- फोर्टिफाइड राईस कर्नेल्सवरील 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला.