GST परिषदेची आजपासून बैठक, Tax स्लॅब कमी करण्यावर घेणार निर्णय; किराणा सामानापासून कारपर्यंत काय स्वस्त होणार?

GST Council Meeting 2025: नव्या बदलांमुळे सण-उत्सव काळात शॉपिंग अधिक स्वस्त होऊ शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins
GST Rate Change: जीएसटी परिषदेच्या निर्णयानंतर नवा जीएसटी रेट 22 सप्टेंबरपर्यंत लागू केला जाऊ शकतो
नवी दिल्ली:

3 सप्टेंबरपासून जीएसटी परिषदेची दोन दिवसांची बैठक (GST Council meeting from today) सुरू होणार आहे. यंदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. किराणा सामानाबरोबर कार आणि इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत अनेक वस्तूंवर टॅक्स कमी करण्याचा प्रस्ताव आहे. (Tax Slabs Likely to Change)

या बैठकीत काय काय बदल होऊ शकतात आणि यामुळे तुमचं दैनंदिन आयुष्य कसं बदलू शकतं, जाणून घेऊया. 

दैनंदिन लागणाऱ्या वस्तू होणार स्वस्त

जीएसटी परिषद १५० हून अधिक वस्तूंवरील टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते.१२ टक्के आणि १८ टक्के प्रोडक्ट ५ आणि ० टक्के स्लॅबमध्ये आणावे ही सरकारची इच्छा आहे. यामध्ये तूप, लोणी, पनीर, ब्रेड, चपाती, पराठा, रोटी, खाखरा, मशरुम आणि खजूरसारख्या पदार्थांचा समावेश आहे. 

सण-उत्सवांपूर्वी स्वस्त खरेदी

पराठासारख्या रेडी-टू-इट फूडवर जीएसटकडून सूट देण्याचा विचार केला जात आहे. सध्या या पदार्थांवर १८ टक्के कर आहे. मिठाइ, पॅक्ड स्नॅक्स, चॉकलेट, पेस्ट्री, आइसक्रीम आणि सीरियल फ्लेक्सवर जीएसटी १८ टक्क्यांहून कमी करून ५ टक्क्यांवर करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमुळे सण-उत्सवांपूर्वी स्वस्त शॉपिंग होऊ शकते. 


तूप आणि डेअरी प्रॉडक्टवर मोठा परिणाम

हेरिटेज फुड्सचे सीईएओ श्रीदीप केसवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीएसटी सुधारणेमुळे तूप, बटर आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांना सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. सध्या, संघटित व्यापाराचा आकार सुमारे ६५,००० कोटी रुपयांचा आहे. ज्यामध्ये फक्त तुपाचा वाटा २५,००० कोटी रुपयांपर्यंत आहे. तूप ही एक सामान्य घरगुती वस्तू आहे, परंतु सध्या त्याची किंमत प्रति लिटर सुमारे ७०० रुपये आहे. यामुळेच लोक स्वस्त पर्यायांकडे किंवा आयात केलेल्या तेलाकडे वळतात. जर जीएसटी दर कमी केले तर तुपाच्या किमती कमी होऊ शकतात आणि त्यामुळे त्याचा वापर वाढेल.

Advertisement

नक्की वाचा - September Holiday : सप्टेंबरमध्ये शाळा आणि बँका किती दिवस बंद राहणार, ही पाहा संपूर्ण यादी

श्रीदीप केसवन यांनी सांगितलं की, तूपाचा खप वाढला म्हणजे दुसऱ्या महागड्या इम्पोर्टेड तेलाची मागणी कमी होईल. यामुळे देशांतर्गत उत्पादनालाही फायदा होईल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.

Advertisement

लहान मुलं आणि शिक्षणासंबंधित सामानात दिलासा

शाळेशी संबंधित वस्तू उदा. नकाशा, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, वही यावरील १२ टक्के जीएसटीत घट करून ० टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या खिश्यावरील ताण कमी होईल. 

गाड्यादेखील स्वस्त होणार

जीएसटी परिषद पॅसेंजर व्हिकल आणि दुचाकी वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर करण्यात येण्याचा विचार सुरू आहे. याचा फायदा मध्यमवर्गीयांना होणार आहे. दिवाळीपूर्वी कार आणि दुचाकी खरेदी करणं स्वस्त होऊ शकतं. 

Advertisement

इलेक्ट्रिक कारवरील कर वाढू शकतो

सर्वसाधारण गाड्यांवर दिलासा मिळू शकतो, तर महागड्या लग्जरी इलेक्ट्रिक गाड्यांवर कर वाढविण्याचा प्रस्ताव आहे. २० लाख ते ४० लाखांपर्यंत ई वाहनांवर जीएसटी पाच टक्क्यांनी वाढून १८ टक्क्यांवर केला जाऊ शकतो. ४० लाखांहून अधिक किंमत असलेल्या ई-कारवर २८ टक्के कर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

यामुळे टेस्ला, बीएमडब्यू, मर्सिडीज आणि बीवायडीसारख्या कंपन्यांना मोठा झटका बसू शकतो. सध्या टाटा आणि महिंद्रा २० लाखांहून कमी ई-कार विकत आहे. त्यामुळे या कंपन्यांवर फारसा परिणाम दिसणार नाही. 

कर स्लॅबमध्ये मोठा बदल

सरकार दर रचनेत बदल करण्याची योजना आखत आहे.  ज्यामध्ये सध्याच्या ४-दर रचनेत बदल करून २-दर रचनेत बदल केला जाईल. सरकार सध्याच्या ४ कर स्लॅब फक्त २ स्लॅब (५% आणि १८%) पर्यंत कमी करू इच्छिते. याशिवाय, लक्झरी कार, एसयूव्ही आणि तंबाखूजन्य पदार्थांसारख्या काही वस्तूंवर ४०% चा विशेष कर दर लागू केला जाऊ शकतो.


लघु उद्योजक आणि स्टार्टअपला फायदा

अर्थमंत्री निर्मला सीतारण यांनी सांगितलं की, जीएसटी २.० मुळे प्रक्रिया अधिक पारदर्शी होईल आणि व्यावसायिकांवरील अनुपालनाचा भार कमी होईल. लहान व्यवसाय आणि स्टार्टअप्ससाठी व्यवसाय करणे सोपे होईल.

नवे दर कधी लागू होणार?

परिषदेत मंजुरी मिळताच नवे जीएसटी रेट २२ सप्टेंबरपर्यंत लागू करण्यात येतील. दिवाळीपूर्वी घरचा बजेट हलका होऊ शकतो. या जीएसटी बैठकीत केवळ टॅक्स रेट ठरविण्यात येणार नाही तर येत्या काळात तुमची बचत, खर्च आणि खरेदीच्या सवयी देखील बदलू शकतात.