कार सोडली, घर बदललं...10 वर्षात 1 कोटी झाले जमा; एका निर्णयामुळे राकेशचं आयुष्यचं बदललं!

राकेश दर महिना २० हजार रुपये केवळ ऑफिसला ये-जा करण्यात खर्च करीत होता. राकेशने केवळ एक निर्णय घेतला आणि १० वर्षात १ कोटी रुपयांची बचत केली. ना सॅलरी वाढली, ना कोणताही व्यवसाय... केवळ लाइफस्टाइल बदलली.

जाहिरात
Read Time: 4 mins

Saving Tips : राकेश कुमार नोएडामध्ये राहतात. ते एका नामांकित कंपनीत सन्मानित पदावर काम करतात. राकेशने सांगितलं की, त्यांचा पगार सहा अंकी आहे. मात्र दिल्ली ते नोएडाच्या प्रवासात त्याच्या पगारातील २० टक्के भाग खर्च होतो. हे २०% वाचवून आपण पुढच्या १० वर्षांत कोट्यशीध होऊ शकतो, या विचाराने त्याला काळजी वाटत होती.

राकेश अनेकदा थकलेला आणि चिंतेत राहत होता. कार्यालयात नव्या कल्पना आणि कामाचा दबाव, सोबत कुटुंबाची जबाबदारी, या सर्व गोष्टींमुळे तो मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या खचत होता.

Advertisement

राकेश सांगतो की, कार्यालय दूर असल्याने अनेक कामं त्याला दुसऱ्यांना पैसे देऊन करवून घ्यावी लागत होती. म्हणजे घरापासून ऑफिसपर्यंतच्या या अंतरामुळे त्याच्या आणि त्याच्या बचतीमधील तफावत सातत्याने वाढत होती.

दहा वर्षांपूर्वी, २०१६ मध्ये, राकेशने एक मोठे पाऊल उचललं आणि आपल्या ऑफिसपासून ५-१० किलोमीटरच्या आत एक घर भाड्याने घेतलं.

राकेश दिल्लीतील मुंडकाचा राहणारा होता. तेथे त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक आहेत. यामुळे तो शिफ्ट करू इच्छित नव्हता.

राकेशने मुंडकातील घर भाड्याने दिलं आणि तो नोएडातील एका व्यवस्थित असलेल्या सोसायटीत भाड्याने राहू लागला. याचा त्याला फायदाही झाला, कारण दिल्लीतील त्याच्या घराचं भाडं इथल्यापेक्षा जास्त होते. यामुळे त्याच्या बचतीत काही अतिरिक्त पैसे जमा झाले.

राकेशने पैसे वाचविण्यासाठी अशा पद्धतीचा अवलंब केला की १० वर्षात त्याला एक कोटी जमा करता आले.

सर्वात मोठा खर्च घरातून कार्यालयात ये-जा करण्याचा होता. त्याने सांगितलं की, कारने ये-जा करण्यात त्याचे दरमाह २० हजार रुपये खर्च होत होते.

नक्की वाचा - Saving tips : सॅलरी येताच संपते? महागाईत पैसे कसे वाचवाल? 20% बचत होईल; पैसे वाचविण्याच्या सोप्या पद्धती

Advertisement

दरमाह किती पैसे वाचले?

राकेशने दरमहा २५,००० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि काही दिवसांनी त्यात अधिक पैसे टाकत राहिला. त्याला सुमारे २०% परतावा मिळाला आणि १० वर्षांनंतर त्याची बचत अंदाजे ९३ लाख रुपये झाली.

याशिवाय त्याने स्वयंपाकी आणि कपडे धुणे यांसारख्या लहानसहान खर्चातही बचत केली. केवळ नोएडाला स्थलांतरित होऊन आणि ऑफिसचा प्रवास कमी करून, राकेशने आपल्या इतर बचतीव्यतिरिक्त १ कोटी रुपयांची बचत केली.

आता विषय असा आहे की, नोएडाला आल्यानंतर राकेश ऑफिसला कसा जात होता? प्रवासासाठी काही तरी खर्च होतच असेल ना. याचं उत्तर राकेशनेच दिलं. तो फिटनेसबाबत सजग झाला. यासाठी त्याने पैशांसह हेल्थचीही काळजी घेण्याचं ठरवलं.

Advertisement

Photo Credit: Canva

फ्रीमध्ये ऑफिसपर्यंतचा प्रवास...

राकेशने कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास जवळपास शून्य केला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पैसे वाचवू शकता. अधिक पैसे वाचवण्यासाठी राकेशच्या काही टिप्स येथे दिल्या आहेत:

१ घर आणि कार्यालयातील अंतर ५-१० किलोमीटर अंतरावर ठेवा. यामुळे प्रवासाचा खर्च कमी होईल.

२ कार्यालयात जाण्यासाठी ई-स्कूटर खरेदी करा. ५-१० किलोमीटरसाठी याचा खर्च २ रुपयांहून कमी होते.

३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत फ्री झालात तर चालत घरी जा. जाताना घरासाठी आवश्यक सामानही घेऊन जा. यामुळे ब्लिंकिटचा अतिरिक्त खर्चही वाचेल आणि वस्तूंच्या मूळ किमती कळतील.

४ राकेश सांगतो की, फिटनेस फ्रीक होण्यासह वॉक आणि सायकलिंग त्याचे दोन आवडते पर्याय होते.

यानंतर राकेशने ई-स्कूटर घेतली. कारण नेहमी वॉक किंवा सायकलिंगवर अवलंबून राहता येत नाही. अनेकदा अर्जंट कामासाठी लवकर कार्यालयात पोहोचावं लागतं, तेव्हा ई-स्कूटरचा वापर करीत होता.

राकेशला काय काय फायदा झाल?

१ वजन कमी झालं...

सायकलिंग आणि चालण्यामुळे राकेशने एका महिन्यात तब्बल १० किलो वजन कमी केलं. यापूर्वी घरातून निघण्याची घाई, मग गाडीने ऑफिसला पोहोचणे आणि दिवसभर तिथे बसून राहणे, यामुळे त्याचे वजन वाढले होते.

२ हृदयाचे आरोग्य सुधारलं..

राकेशने वयाच्या २८ व्या वर्षी हा नित्यक्रम सुरू केला. आज तो ३८ वर्षांचा आहे. त्याच्या कुटुंबात हृदयविकाराचा झटका आणि हृदयक्रिया बंद पडल्याचा इतिहास आहे. वयाच्या ३३ व्या वर्षी तपासणीदरम्यान, डॉक्टरांनी इशारा दिला होता की, जर त्याने काळजी घेतली नाही, तर त्याला वयाच्या ३५-४० वर्षांपर्यंत समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चालण्याने आणि सायकलिंगने त्याचे एकंदर आरोग्य सुधारले, तणाव कमी झाला आणि त्याला आपले भविष्य सुरक्षित झाल्याची मानसिक शांती मिळाली. यामुळे त्याच्या हृदयाचे आरोग्य सुधारले.

३. पायांची ताकद वाढली...

पूर्वी, अजिबात न चालल्यामुळे राकेशच्या पायांच्या स्नायूंमध्ये आणि गुडघ्यांमध्ये वेदना होत असत. चालण्याने आणि सायकलिंगने त्याचे पाय मजबूत झाले.

तुमच्या मनात येऊ शकतात या शंका...

१ SIP द्वारे १० वर्षांत १ कोटी रुपये कसे कमवू शकता?

नियमित गुंतवणूक आणि चांगला परतावा (१५-२०%) मिळाल्यास दीर्घकाळात मोठा निधी तयार होऊ शकतो.

२ ऑफिसजवळ घर घेतल्याने पैसे वाचू शकतात का?

नक्की. प्रवास आणि वेळ दोघांची बचत होते. ज्यामुळे एकूण खर्च कमी होतो.

३ दररोजचा प्रवास कमी केल्याने काय फायदा होतो?

पैशांच्या बचतीसह तणाव कमी होता आणि आरोग्य सुधारतं.

४ वॉक आणि सायकलिंगमुळे खर्च शून्यापर्यंत पोहोचू शकतो?

नक्कीच. जर अंतर कमी असेल तर प्रवासाचा खर्च जवळपास शून्य होतो.