PPF Investment : बँकांऐवजी PPF मधील गुंतवणूक कशी ठरेल फायदेशीर? हे 5 मुद्दे समजून घ्या

Investment Tips : PPF मधील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये गुंतवलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंत तुम्ही करपात्र उत्पन्नातून वजावट घेऊ शकता.

जाहिरात
Read Time: 2 mins
PPF Investment Tips

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) देशातील लोकप्रिय गुंतवणूक योजनेपैकी एक योजना आहे. जोखीम न घेता गुंतवणूक करणाऱ्यांना गुतंवणूकदारांसाठी ही एक आकर्षक योजन आहे. दीर्घकालीन ही एक फायदेशीर योजना आहे. याशिवाय या योजनेत रिटर्न आणि गुंतवणूक दोन्हीवर कर सवलत मिळते. नोकरी नसणाऱ्यांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ देखील निवडू शकतात. या योजनेत गुंतवणुकीचे 5 मोठे फायदे जाणून घेऊया.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

कोणतीही जोखीम नाही, परताव्याची हमी

पीपीएफमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. या योजनेत गुंतवलेला प्रत्येक पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो. यामध्ये पैसे गमावण्याचा धोका अजिबात नाही. जर तुम्ही बँकेत पैसे जमा केले, तर DICGC कायद्यानुसार (डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) सध्या गॅरंटी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांवरच उपलब्ध आहे. मात्र या योजनेत परताव्याची हमी सरकार देते.

(नक्की वाचा-  Bank Account : सॅलरी अकाऊंट आणि सेव्हिंग्स अकाऊंटमध्ये नेमका फरक काय?)

कर संबंधित फायदे

PPF मधील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये गुंतवलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंत तुम्ही करपात्र उत्पन्नातून वजावट घेऊ शकता. याशिवाय योजनेंतर्गत मिळणारे व्याज आणि 15 वर्षांनंतर मिळालेल्या मॅच्युरिटी रकमेवर संपूर्ण कर सूट आहे. अशाप्रकारे, कर सवलतींच्या बाबतीत ही एक उत्तम योजना आहे.

छोट्या गुंतवणुकीवर जास्त परतावा

PPF मध्ये फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. दरवर्षी तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये किंवा एकरकमी पैसे यात गुंतवू शकता. म्हणजेच पीपीएफमध्ये गुंतवणुकीचे नियम अगदी सोपे आहेत.

Advertisement

(नक्की वाचा- SIP calculator: रोज 100 रुपये गुंतवा अन् करोडपती बना, विश्वास होत नाही तर ही बातमी नक्की वाचा)

व्याजदर काय? 

PPF योजनेत व्याज दर नेहमी 7-8 टक्क्यांच्या दरम्यान राहतो. आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच सध्या 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. जे वार्षिक आधारावर चक्रवाढ आहे. बहुतेक बँकांच्या एफडीपेक्षा हे चांगले आहे.

पीपीएफवर कर्जाची सुविधा

या योजनेचा मोठा फायदा म्हणजे जर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळण्यात अडचण येत असेल आणि तुम्हाला तारण काहीही घ्यायचे नसेल, तर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यावरही कर्ज घेऊ शकता. यामध्ये खाते उघडल्यानंतर तिसऱ्या ते सहाव्या वर्षात कर्ज घेता येते. यामध्ये व्याजदरही परवडणारा आहे.
 

Advertisement