श्रीमंत बनावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. प्रत्येकालाच वाटत असतं की आपला खिसा पैशाने भरलेला असावा. त्यामुळे अनेक जण लखपती किंवा करोडपती बनण्याचे स्वप्न पाहात असतात. पण हे काही एक रात्रीत होत नाही, किंवा नाही श्रीमंत बनण्याचा असा काही शॉर्टकट आहे. पण रोज थोडे पैसे साठवून, ते योग्य ठिकाणी गुंतवल्यास तुम्हाला श्रीमंत बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
डिजिटल युगात मोठा फंड तयार करणं हे सहज शक्य झालं आहे. कमी वेळात जास्त पैसे कमवण्याकडे अनेकांचा कल असतो. पैसे दुप्पट तिप्पट कसे करता येतील याचा ते विचार करतात. त्यातून अनेक जण शेअर बाजारात गुतवणूक करतात. पण त्यात ही मोठं जोखीम आहे. हे जोखीम जर तुम्हाला टाळायचं असेल म्यूचुअल फंड (Mutual Funds)हा एक चांगला पर्याय आहे. यात सिस्टमैटिक इन्वेस्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून तुम्ही दररोज 100 रुपये जमा करून करोडपती होवू शकता.
यावर कदाचित तुमचा विश्वास पटणार नाही. पण हे खरं आहे. त्यासाठी SIP च्या माध्यमातून करोडपती होण्यासाठी तुम्हाला कशी आणि किती गुंतवणूक करावी लागणार आहे. शिवाय त्यासाठी किती वेळ लागतो हे आपण समजवून घेवूयात. त्यासाठी तुम्हाला रोज 100 रुपये साठवावे लागणार आहेत. जर तुम्हाला करोडपती होण्याचं स्वप्न पुर्ण करायचं आहे तर जास्त नाही तर दररोज तुम्हाला केवळ 100 साठवायचे आहेत. तुम्हा साठवलेले हे पैसे तुम्ही म्यूचुअल फंड एसआईपी (SIP Investment) मध्ये गुंतवायचे आहेत. म्यूचुअल फंडमध्ये तुम्हाला 12 टक्के सरासरी परतावा मिळतो. पण याला काही गॅरंटी नाही. यात वेळे नुसार बदल होत राहातात. हा दर कमी जास्त होतो.
लागोपाठ 30 वर्षे तुम्ही म्यूचुअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करा. तुम्ही रोज 100 रुपये गुंतवणूक करत असाल. म्हणजेच महिन्याला 3000 हजार तुमचे होतात. म्हणजेच दर महिन्याला 3000 रुपये तुम्ही सलग 30 वर्षे गुंतवणूक कराल. 3000 प्रमाणे 30 वर्ष गुंतवणूक केल्यास एकूण 10,80,000 रुपये एकूण गुंतवणूक तुमची होणार आहे. त्यानंतर तुमचा करोडपती होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसआयपी कॅल्क्युलेटर (SIP Return Calculator) नुसार दर महिना 3000 गुंतवणूकीवर 12 टक्के परतावा तुम्हाला मिळणार आहे. त्यावर तुम्हाला 95,09,741 एवढा परतावा मिळेल. त्यावर जर व्याज जोडलं गेलं एकूण रक्क 1,05,89,741 तुम्हाला मिळाले. म्हणजेच शंभर रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्ही 30 वर्षात करोडपती होवू शकता.
ट्रेंडिंग बातमी - Bangladeshi illegal immigration : बांगलादेशी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ
अशा प्रकारे म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक (Mutual Funds Investment) केल्यास तुम्ही तुमचे पैसे कितीतरी पटीने वाढतील. गुंतवणुकीसाठी SIP हा चांगला पर्याय आहे. मात्र ही गुंतवणूक करत असताना तुम्ही त्या आधी एका आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. एसआयपी बाबत तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आर्थिक सल्लागाराला भेटा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world