SIP मध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी? 'या' टीप्सचा होईल मोठा उपयोग

करोडपती होण्यासाठी सोपा आणि कमी जोखमीचा हा प्लॅन आहे, यावर तज्ज्ञांचं एकमत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आपण श्रीमंत व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आर्थिक परिस्थिती भक्कम करण्याबरोबरच स्वत:चं चांगलं घर, अद्यावत गाडी घेणं हे देखील तुमचं स्वप्न असेल तर बचतीला पर्याय नाही. बचत करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्या प्रत्येक पर्यायाचे काही फायदे-तोटे आहेत. पण, बचतीमधील सर्वात सोपा आणि कमी जोखमीचा पर्याय कोणता? असा प्रश्न तुम्ही कोणत्याही तज्ज्ञांना विचारला तर सर्वजण तुम्हाला 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेट प्लॅन' म्हणजेच SIP हे उत्तर देतील.

करोडपती होण्यासाठी सोपा आणि कमी जोखमीचा हा प्लॅन आहे, यावर तज्ज्ञांचं एकमत आहे. SIP करताना कशामध्ये गुंतवणूक करावी आणि कशात करु नये? याची माहिती अनेकांना नसते. तुम्हालाही SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करुन करोडपती व्हायचं असेल, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आम्ही देणार आहोत. 

कशी करावी गुंतवणूक?

नोकरदार आणि दरमहा नियमित उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना SIP हे बचतीचं उत्तम माध्यम आहे. तुम्ही अगदी 500 रुपयांपासून सुरुवात करु शकता.  तुमच्या खिशाला फारसा भार पडणार नाही, अशी गुंतवणूक करु शकता. त्यामुळे तुम्हाला बचतीची सवय लागेल. त्याचबरोबर छोटी रक्कम गुंतवून दीर्घकाळासाठी चांगली रक्कम जमा करता येते.

SIP मध्ये गुंतवणुकीच्या रकमेसोबतच कालावधीमध्येही लवचिकता आहे. तुम्ही रोज, मासिक किंवा त्रैमासिक गुंतवणूक करु शकता. तुमचे उत्पन्न कमी-जास्त झाले तर त्याप्रमाणे एसआयपीमधील रक्कमही बदलू शकता. विशष म्हणजे बाजाराची पातळी कशीही असली तरीही तुम्ही हे सुरु ठेवू शकता. मंदी असेल तर त्याच पैशासाठी तुम्हाला जास्त युनिट्स मिळतील, मार्केटमध्ये तेजी असेल तर कमी युनिट्स मिळतील. दीर्घकाळात तुमच्या युनिटची किमत सरासरी होईल. 

Advertisement

कोणत्या चूका टाळाव्या?

- SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी पुरेसा अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यास आणि संशोधनाशिवाय गुंतवणूक केली तर तुम्हाला फटका बसू शकतो. त्यासाठी तुम्ही संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. 
- जास्त पैसा मिळवण्याच्या नादात अनेक जण मोठ्या गुंतवणुकीनं सुरुवात करतात. काही कालावधीनंतर त्यांना पुन्हा ती रक्कम चालू ठेवणे शक्य होत नाही. ही चूक करु नका. 
- शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या चढउतारामुळे SIP मध्ये बदल करु नका. तुमची दीर्घकालीन गुंतवणूक कायम ठेवा.
- SIP सुरु केल्यानंतर महत्त्वाच्या कारणांशिवाय मध्येच बंद करु नका

Topics mentioned in this article