Income Tax Refund 2026: जर तुम्ही असेसमेंट इअर 2026-27 साठी (Assessment Year 2026-27) तुमचा इनकम टॅक्स रीटर्न (ITR) फाइल केले असेल पण अद्याप टॅक्स रिफंड तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. अनेकदा लहान-लहान चुका किंवा काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे रिफंड मिळण्यास उशीर होतो. अशा वेळी रिफंड नेमका का अडकतो आणि त्याचे स्टेटस कसे चेक केले जाऊ शकते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्या पाच सर्वात सामान्य कारणांमुळे टॅक्स रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो आणि ऑनलाइन स्टेटस पाहण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊया...
1. तुम्ही ITR चे e-Verification केले आहे का?
फक्त इनकम टॅक्स रीटर्न सबमिट करणे पुरेसे नसते. रीटर्न जमा केल्यानंतर त्याचे e-Verification करणे देखील आवश्यक असते. e-Verification यशस्वीपणे पूर्ण झाल्यावरच आयकर विभाग रिटर्नवर प्रक्रिया (Processing) सुरू करतो. जोपर्यंत तुम्ही हे e-Verify करत नाही, तोपर्यंत आयकर विभाग तुमच्या रिफंडची प्रोसेसिंग सुरू करत नाही. जर ही प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसेल, तर तुमचा टॅक्स रिफंड सध्या होल्डवर राहील.
2. Form 26AS, AIS आणि TIS मधील डेटा मॅच झाला नाही?
आयकर विभाग तुमच्या ITR मध्ये दिलेल्या माहितीची जुळवाजुळव (Matching) Form 26AS, Annual Information Statement (AIS) आणि Taxpayer Information Summary (TIS) सोबत करतो. जर पगार (Salaray), TDS, अॅडव्हान्स टॅक्स किंवा इतर कोणत्याही उत्पन्नाशी संबंधित माहितीत तफावत आढळली तर विभाग त्याची काटेकोरपणे तपासणी करतो. हेच रिफंड मिळण्यास उशीर होण्याचे एक कारण बनू शकते.
(नक्की वाचा: RBI चा मोठा निर्णय:1 ऑक्टोबरपासून FD च्या नियमात महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?)
3. बँक खात्याचा तपशील (Bank Details) बरोबर आहे की नाही?
इनकम टॅक्स रिफंड थेट तुमच्या 'प्री-व्हॅलिडेट' (Pre-validated) बँक खात्यात पाठवला जातो. जर बँक खाते क्रमांक, IFSC कोड चुकीचा टाकला गेला असेल किंवा तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर बँक खाते प्री-व्हॅलिडेट केले नसेल तर रिफंड ट्रान्सफर फेल होऊ शकते किंवा उशीर होऊ शकतो. अशा वेळी एकदा तुमच्या बँकेचा तपशील नक्की तपासून घ्या.
4. मागील वर्षाचा काही टॅक्स थकीत तर नाही ना?
जर कोणत्याही जुन्या असेसमेंट इयरचा टॅक्स थकीत (Outstanding Tax Demand) असेल तर आयकर विभाग निश्चित प्रक्रियेनुसार तुमच्या सध्याच्या रिफंडमधून ती रक्कम अॅडजस्ट करू शकतो. या कारणामुळे एकतर रिफंडची रक्कम कमी होऊ शकते किंवा पैसे मिळण्यास जास्त वेळ लागू शकतो.
5. तुमचा ITR स्क्रूटनीसाठी (Scrutiny) निवडला गेला आहे का?
काही प्रकरणांमध्ये आयकर विभाग 'रिस्क पॅरामीटर' किंवा कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेच्या आधारावर ITR स्क्रूटनीसाठी (तपासणीसाठी) निवडतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही चूक केली आहे, पण जोपर्यंत आवश्यक तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत रिफंड जारी केला जात नाही.
(नक्की वाचा: VIDEO:वयाच्या 25व्या वर्षी 5 कोटींची कमाई! IIM बंगळुरूच्या विद्यार्थ्याने सांगितला श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला)
6. ऑनलाइन कसे चेक कराल ITR Refund Status?
जर तुम्हाला तुमचा टॅक्स रिफंड कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर त्याचे स्टेटस ऑनलाइन सहज पाहिले जाऊ शकते. यासाठी तुम्ही Income Tax e-Filing Portal किंवा NSDL Refund Tracking सुविधेचा वापर करू शकता.
Income Tax Portal वर ITR Refund Status चेक करण्याची पद्धत:
- सर्वात आधी Income Tax e-Filing Portal वर लॉगिन करा.
- आता e-File मेन्यूमध्ये जा आणि Income Tax Returns वर क्लिक केल्यानंतर View Filed Returns हा पर्याय निवडा.
- Assessment Year 2026-27 निवडा आणि View Details वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला रीटर्नच्या प्रोसेसिंगचे स्टेटस आणि टॅक्स रिफंडचे सध्याचे स्टेटस स्क्रीनवर दिसून येईल.
पटापट रिफंड मिळवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या:
- ITR फाइल केल्यानंतर e-Verification नक्की पूर्ण करा.
- Form 26AS, AIS आणि TIS मध्ये उपलब्ध माहितीची जुळवाजुळव केल्यानंतरच रीटर्न भरा.
- बँक खात्याचा तपशील अपडेट ठेवा आणि ते प्री-व्हॅलिडेट करायला विसरू नका.
- जर कोणत्याही जुन्या टॅक्सची मागणी प्रलंबित असेल तर त्याचेही स्टेटस तपासून घ्या.
- या लहान-लहान गोष्टींची काळजी घेतल्यास टॅक्स रिफंडची प्रक्रिया सोपी होऊ शकते आणि रिफंड मिळण्यात होणारा उशीर टाळता येऊ शकतो.