Share Market Update : शेअर बाजारात कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज मोठी सुधारणा झालेली पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील मजबूत संकेत यामुळे देशांतर्गत बाजारातही जोरदार तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून येत आहे. कालच्या 13 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाल्यानंतर आज अवघ्या काही मिनिटात मार्केट कॅप आज 8.47 लाख कोटी रुपयांची वसूली झाली आहे. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.47 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
(नक्की वाचा- भारत-श्रीलंका मैत्रीचे उघडले नवे दार, अदाणी समुहाच्या कोलंबो टर्मिनलचं काम सुरु)
बीएसई सेन्सेक्स सध्या 1220.50 अंकांनी म्हणजेच 1.67 टक्क्यांच्या वाढीसह 74358.40 वर आहे आणि तर निफ्टी 385.05 अंकांनी म्हणजेच 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 22546.65 वर आहे. काल सेन्सेक्स 2226.79 अंकांनी म्हणजेच 2.95% ने घसरून 73137.90 वर बंद झाला. तर निफ्टी 3.24% ने म्हणजेच 742.85 अंकांनी घसरून 22161.60 वर बंद झाला.
अदाणी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये वाढ
अदाणी ग्रुपच्या सर्व शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अदाणी एंटरप्रायझेसपासून ते अदानी पोर्ट्स, अदानी एनर्जी सोल्युशन्सपर्यंत सुरुवातीच्या ट्रेडमध्ये सर्व शेअर्समध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
(नक्की वाचा- ! बँकांचं कर्ज स्वस्त तर EMI देखील कमी होणार? रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याची शक्यता)
जागतिक स्थिती
अमेरिकन शेअर बाजार काल सलग तिसऱ्या दिवशी घसरून बंद झाले डाऊ जोन्स 389 अंकांनी घसरला तर नॅस डॅश 15 अंकांची वाढून बंद झाला. आशियाई बाजार आज सकाळी मजबूत उघडले आहेत. जपानचा निर्देशांक निकाई 6 टक्के उसळला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीननं अमेरिकन मालावर लावलेला 34 टक्के कर मागे घेण्यासाठी चीनला आज म्हणजे 8 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. ही मुदत चीनने पाळली नाही तर चीनवर 50 टक्के कर लावू अशी धमकी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.