
Adani Group's Colombo Terminal Started Working: देशातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर कंपनी अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडनं (APSEZ) कोलंबो बंदरावरील कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल (CWIT) चं ऑपरेशन सुरु करण्याची घोषणा केली आहे.
हे टर्मिनल सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागिदारीमध्ये (PPP) विकसित करण्यात आले आहे. अदाणी पोर्ट्स, श्रीलंकेतील प्रमुख कंपनी जॉन किल्स होल्डिंग्स पीएलसी (JKH) आणि श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटी मिळून याचं संचालन करत आहेत. हा प्रकल्प 35 वर्षांचा असून बांधा, वापर आणि हस्तांतर करा (BOT) अंतर्गत संचालित होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल का आहे खास?
CWIT योजनेमध्ये 800 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये आणि 1,400 मीटर लांब आणि 20 मीटर खोलीच्या घाटासह, टर्मिनल वार्षिक 3.2 दशलक्ष टीईयू (वीस-फूट समतुल्य युनिट्स) हाताळण्याची याची क्षमता आहे.
हे कोलंबोमधील पहिले डीप वॉटर टर्मिनल आहे. जे पूर्णपणे स्वयंचलित आहे. या टर्मिनलची रचना कार्गो हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी, जहाजांच्या वळणाच्या वेळेत सुधारणा करण्यासाठी आणि दक्षिण आशियातील प्रमुख ट्रान्सशिपमेंट हब म्हणून बंदराची स्थिती सुधारण्यासाठी करण्यात आली आहे.
या प्रकल्पाच्या निर्मितीचे काम 2022 साली सुरु करण्यात आले. त्यामध्ये वेगानं प्रगती झाली आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा स्थापन करण्याची क्षमता पूर्ण होत आहे. CWIT प्रादेशिक सागरी लॉजिस्टिकमध्ये ऑपरेशनल कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेमध्ये नवीन मानके स्थापित करण्यासाठी सज्ज आहे.

गौतम अदाणींनी काय सांगितलं?
अदाणी समूहाचे (Adani Group) संचालक गौतम अदाणी यांनी सांगितलं की, 'CWIT मधील कामकाजाची सुरुवात हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सहकार्यातील एक मैलाचा दगड आहे. हे टर्मिनल केवळ हिंदी महासागरातील व्यापाराच्या भविष्याचेच प्रतिनिधित्व करत नाही, तर त्याचे उद्घाटन श्रीलंकेसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. या प्रकल्पामुळे त्यांचे जागतिक सागरी नकाशावरील स्थान आणखी भक्कम झाले आहे.
CWIT प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. तसंच सागरी राष्ट्रासाठी मोठ्या आर्थिक संधी निर्माण होतील. हे दोन शेजारी देशांमधील सखोल मैत्री आणि वाढत्या धोरणात्मक संबंधांचे उदाहरण आहे. दूरदर्शी सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून काय साध्य केले जाऊ शकते हे यामधून सिद्ध झाले आहे.
जगात कुठंही मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याची अदाणी समुहाची क्षमता हा जागतिक स्तरावरील प्रकल्प विकसित केल्यानं दिसून आली आहे.
( नक्की वाचा : Dharavi Redevelopment: रेल्वेच्या 40 एकर जमिनीचाही होणार उपयोग, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा )
श्रीलंकेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा का?
जॉन कील्स ग्रुपचे चेअरपर्सन कृष्णा बालेंद्र म्हणाले, “प्रादेशिक सागरी केंद्र म्हणून श्रीलंकेची स्थिती मजबूत करणारा प्रकल्प वेस्ट कंटेनर टर्मिनलच्या विकासातील प्रगती पाहून आम्हाला अभिमान वाटतो. हा प्रकल्प जॉन कील्स ग्रुपच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीपैकी एक आहे आणि श्रीलंकेतील खासगी क्षेत्रातील सर्वात लक्षणीय गुंतवणूक आहे.
श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटी आणि अदाणी समुहासोबत, आम्ही एक प्रमुख ट्रान्सशिपमेंट हब म्हणून कोलंबोची ओळख निर्माण करु. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील जागतिक व्यापार आणि संपर्क वाटेल असा आम्हाला विश्वास आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world