Saving tips : सॅलरी येताच संपते? महागाईत पैसे कसे वाचवाल? 20% बचत होईल; पैसे वाचविण्याच्या सोप्या पद्धती

पगाराचा आकडा तोच, मात्र खर्च वाढतोय? महिन्याच्या अखेरीस तुमचा खिसा रिकामा होत असेल तर हे ३ बदल तुमचं अर्थकारण बदलवू शकतं.

जाहिरात
Read Time: 4 mins

Inflation Money Saving Tips : पगाराचा आकडा तोच, मात्र खर्च वाढतोय? महिन्याच्या अखेरीस तुमचा खिसा रिकामा होत असेल तर हे ३ बदल तुमचं अर्थकारण बदलवू शकतं. गेल्या काही काळात महागाईमुळे लोक चिंतेत आहेत.  बाजारात भाज्या आणि खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम बजेटवर पाहायला मिळत आहे. 


पैसे कसे वाचवाल? 

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थेट परिणाम केवळ प्रवासापर्यंत सीमित नाही, तर ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू महाग होऊ शकतात. त्याशिवाय विजेचं बिल, शाळेचे फी, मेडिकल खर्च आणि इएमआयसारख्या जबाबदाऱ्यांमुळे मध्यमवर्गीय कुटुंबावरील  दबाव अधिक वाढला आहे. 

Advertisement


स्टेप १ - महागाईत पैसे कसे वाचवाल आणि साइड इन्कम कशी वाढवाल?

सद्यस्थितीत सर्वात मोठी समस्या कमाई नाही तर विचार न करता खर्च करणं ही आहे. असे अनेकजण असतात ज्यांचा ठीक पगार असतो, मात्र महिनाअखेरपर्यंत त्यांचं अकाऊंट रिकामी होतं. कारण? लहान वाटणाऱ्या पण मोठा परिणाम करणाऱ्या सवयी. वारंवार ऑनलाइन शॉपिंग, विकेंडमध्ये बाहेर खाणं, प्रत्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सबस्क्रिप्शन. यांसारख्या अनेक गोष्टीत पैसे खर्च होतात. अशावेळी आपल्याला पैशांची गरज लक्षात घेणं आवश्यक आहे.  या कारणास्तव, किमान एक-दोन महिने प्रत्येक खर्चाची नोंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पैसे कुठे वाचवता येतील हे समजणे सोपे जाते.

स्टेप २ - आपत्कालिन फंड आणि गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करू नका...

कशी सुरुवात कराल..

१ ते २ महिन्यापर्यंत प्रत्येक खर्च लिहून काढा.
अनावश्यक खर्च ओळखा
लहान लहान खर्च कसा मोठा परिणाम करतात याचा आढावा घ्या. 

आपल्या हातातले पैसे नेमके कुठे खर्च होत आहेत, हे कळल्यानंतरच तुम्ही पैसे वाचविण्यास सुरुवात करू शकाल. 

स्टेप ३ - केवळ पैसे कमी खर्च करणं नव्हे तर स्मार्ट सेव्हिंगही महत्त्वाचं...

अनेकांना वाटतं की, पैसे वाचविण्याचा अर्थ कमी खर्च करणं. मात्र सत्य वेगळं आहे. पैसे वाचविणं पुरेसं नसतं. पैसे योग्य ठिकाणी ठेवणं आणि वाढविण्यास प्रयत्न करणं आवश्यक आहे. अकाऊंटमधये ठेवलेले पैसे सुरक्षित आहे मात्र यात वाढ होत नाही. दीर्घकाळासाठी बँकेत पैसे ठेवणं योग्य मानलं जात नाही. नोकरी गमावणे, आजारपण किंवा अचानक मोठा खर्च आल्यास येणारा ताण कमी करण्यासाठी, किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाएवढा आपत्कालीन निधी बाजूला ठेवणे हे ध्येय असलं पाहिजे.

आपल्या आर्थिक सवयी बदला...

३ ते ६ महिन्यांच्या खर्चाइतके पैसे वेगळे काढून ठेवा. 
अचानक नोकरी गमावल्यास, आजारपणात किंवा आपत्कालीन परिस्थितीत स्वतःला आधार देण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
गुंतवणूक करणे हा तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा.
SIP, PPF आणि RD सारख्या पर्यायांचा विचार करा.
आरोग्य विमा असणे अत्यावश्यक. 

Advertisement


स्टेप ४ - ऑनलाइन नव्हे कॅशमध्ये करा व्यवहार

लाइफस्टाइल इतक्या जलद गतीने वाढत आहे की, आता लोक सोबत कॅश ठेवत नाहीत. याकडे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही पाहू शकतो. मात्र जेव्हा कधी तुम्ही कोणतंही सामान खरेदी करायला जाल किंवा डील कराल त्यावेळी पैसे कॅशमध्ये द्या. यामुळे तुमच्याकडून किती रुपये खर्च झाले हे लक्षात येईल. 


स्टेप ५ - केवळ एका कमाईवर अवलंबून राहणं महागात पडू शकतं...

महागाई वाढीसह आता लोक मोठ्या संख्येने अतिरिक्त उत्पन्नाच्या मार्गाचा शोध घेत आहेत. कोणी ऑनलाइन ट्यूशन घेतं, तर कोणी फ्रीलान्सिंग करतं. युट्यूब, सोशल मिडिया किंवा ब्लॉगिंग किंवा छोट्या ऑनलाइन बिझनेसच्या माध्यमातून अतिरिक्त कमाईचा प्रयत्न करीत आहेत. 

Advertisement

जर एखाद्या व्यक्तीकडे कोणत्याही खास क्षेत्रातील अनुभव असेल तर ते सल्लागार म्हणून किंवा पार्ट टाइम काम करूनही आपल्या उत्पन्नात भर घालू शकतात. तुम्हाला जी पद्धत सर्वात सोयीस्कर वाटेल, त्याद्वारे तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. 

FAQs....

१. महागाईच्या काळात तुम्ही पैसे कसे वाचवू शकता?

महागाईच्या काळात पैसे वाचवण्यासाठी तुमच्या खर्चाचा आढावा घ्या. बजेट तयार करा आणि अनावश्यक खर्च कमी करा. वीज आणि स्वयंपाकघराच्या खर्चात बचत करा. दर महिन्याला तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचत किंवा गुंतवणुकीत टाका.

२. तुम्ही दर महिन्याला किती पैसे वाचवावेत?

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी तुमच्या उत्पन्नापैकी किमान २०% रक्कम बचत किंवा गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवली पाहिजे.

३. तुमचा आपत्कालीन निधी किती असावा?

आपत्कालीन निधी इतका मोठा असावा की त्यातून तुमचा ३ ते ६ महिन्यांचा खर्च सहजपणे भागेल. नोकरी गमावणे, आजारपण किंवा अनपेक्षित खर्चाच्या वेळी हे उपयुक्त ठरते.

४. तुमचा खर्च कुठे वाढत आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता?

UPI, रोख रक्कम किंवा ॲपद्वारे किमान १-२ महिन्यांच्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा. यामुळे तुम्हाला स्पष्टपणे कळेल की तुमचा सर्वात जास्त खर्च कशावर होत आहे आणि कुठे कपात करता येईल.

५. केवळ तुमच्या पगारावर खर्च सांभाळणे कठीण आहे का?

आजच्या काळात, केवळ एका उत्पन्नावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच, फ्रीलान्सिंग, ऑनलाइन काम किंवा पार्टटाइम नोकरी यांसारखे अतिरिक्त उत्पन्नाचे छोटे स्रोत शोधणे फायदेशीर मानले जाते.

६. अतिरिक्त उत्पन्न वाढवण्याचे सोपे मार्ग कोणते आहेत?

तुम्ही तुमच्या कौशल्यांच्या आधारे ऑनलाइन शिकवणी, फ्रीलान्सिंग, यूट्यूब, ब्लॉगिंग किंवा लहान ऑनलाइन व्यवसायाद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवणे सुरू करू शकता.

७. कोणते खर्च कमी करू नयेत?

आरोग्य, मुलांचे शिक्षण, आवश्यक विमा आणि सुरक्षा यांसारख्या गोष्टींवर पैसे वाचवण्याचा प्रयत्न करू नये.  कारण भविष्यासाठी आवश्यक गुंतवणूक आहेत.

८. लहान खर्चांचा खरोखरच मोठा परिणाम होतो का?

होय, वारंवार बाहेर जेवणे, ऑनलाइन खरेदी आणि सबस्क्रिप्शन यांसारखे लहान खर्च हळूहळू मोठे खर्च बनू शकतात. यावर नियंत्रण ठेवून मोठी बचत करता येते.