शेअर बाजारात गुंतवणूक करायचीय? मग ही बातमी नक्की वाचा

सेबी ह्युंदाई मोटर्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. ह्युंदाई मोटर्स बाजारातून साधारणतः 25,000 कोटी रुपये उभे करण्याची तयारीत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतीय शेअर बाजार रोज नव्या उंचीवर जात असताना आता बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणखी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. देशातील एक प्रमुख कारनिर्मित कंपनी म्हणून प्रसिद्ध असणारी ह्युंदाई मोटर्स येत्या काही दिवसात ipo च्या माध्यमातून पैसे उभे करण्यासाठी भारतीय शेअर बाजारात उतरत आहे. एलआयसीच्या आयपीओ नंतर ह्युंदाई मोटर्स आयपीओ हा सगळ्यात मोठा असण्याची शक्यता आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सेबी ह्युंदाई मोटर्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. ह्युंदाई मोटर्स बाजारातून साधारणतः 25,000 कोटी रुपये उभे करण्याची तयारीत आहे. या पंचवीस हजार कोटी रुपयांतून ह्युंदाई मोटर्स भारतात त्यांच्या कारनिर्मिती कारखान्यांमध्ये गुंतवणूक वाढवायची आहे. मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड या सरकारच्या धोरणाला अनुसरून ह्युंदाई मोटर्स आंतरराष्ट्रीय बाजारासाठी भारतात कार निर्मिती करू इच्छिते. त्यासाठी त्यांना भांडवलाची गरज आहे. आयपीओच्या माध्यमातून हे भांडवल उभे करून  ह्युंदाई मोटर्सचा भारतीय उद्योग प्रामुख्याने दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि आफ्रिकेतील देशांमधील मागणी पूर्ण करणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी इंदिरा गांधींचं केली 'मदर इंडिया' म्हणून प्रशंसा

गेल्या दीड एक वर्षात देशातील कार उद्योजक मोठ्या प्रमाणात निर्यात बनला आहे. प्रामुख्याने चीनमधून निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सवर जगभरातून येऊ घातलेल्या कारचा बोजा बघता जागतिक कंपन्यांनी 'चायना प्लस' ची  रणनीती आखली आहे. भारत सरकारचे मेक इन इंडिया फॉर वर्ल्ड आणि प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटीव्ह स्कीम ही दोन धोरण मोठ्या परदेशी कंपन्यांच्या चायना प्लस रणनीतीला पूरक आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - नालासोपाऱ्यात खाणीतील तलावात 2 मुले बुडाली; तीन जण बेपत्ता

याचा एकत्रित फायदा घेण्यासाठी ह्युंदाई मोटर्सने भारतात त्यांच्या कारनिर्मिती कारखान्यांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हा आयपीओ आणला जात आहे. शेअर बाजारात तब्बल वीस वर्षानंतर एखादी कार निर्माता कंपनी गुंतवणूकदारांसाठी आयपीओ आणत आहे त्यामुळे या आयपीओ संबंधी बाजारात मोठं कुतूहल आहे .आयपीओचा प्राईस बॅंड म्हणजे प्रती शेअर किमान आणि कमाल किंमत नेमकी किती असेल हे येत्या काही दिवसात कळणार आहे.

Advertisement

Topics mentioned in this article