गुंतवणूक हा सुरक्षित भविष्याचा एक मार्ग आहे. म्हणून अर्थविषयक सल्लागार नेहमी जास्तीत जास्त गुंतवणुकीचा सल्ला देतात. मात्र गुंतवणूक कमी वयात सुरु केली तरी त्याचे फायदे मोठे असून शकतात. कमी वयात अवघ्या 1000 रुपयांपासून सुरु केलेली गुंतवणूक तुम्हाला कोट्याधीश बनवू शकते. म्युच्युयल फंड हा एक गुंतवणुकीचा उत्तर पर्याय आहेत.
SIP द्वारे आपली गुंतवणूक जितकी जास्त होईल, तितका फायदा जास्त असतो. वयाच्या 25 व्या वर्षी जर 1000 रुपये गुंतवणूक सुरू केली आणि दरवर्षी यात 5 टक्के वाढ केली तर त्यातून उभी राहणारी रक्कम तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी असेल. यातून तुम्ही कोट्याधीश होऊ शकता.
(नक्की वाचा- Bajaj Housing Finance IPO : नव्या आयपीओला अभूतपूर्व प्रतिसाद मिळण्याची शक्यता)
1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून कसं बनाल करोडपती?
- SIP सुरु करण्याचं वय- 25 वर्षे
- गुंतवणुकीचा कालावधी - 35 वर्षे
- अंदाजे वार्षिक नफा- 12 टक्के
- पहिल्या वर्षी SIP रक्कम- 1000 रुपये
- प्रत्येक वर्षी SIP मध्ये वाढ- 5 टक्के
- 35 वर्षात एकूण गुंतवलेली रक्कम- 10 लाख 83 हजार
- 35 वर्षानंतर मिळणारी एकूण रक्कम - 99 लाख 69 हजार
(नक्की वाचा : आमीर खान, रणबीर कपूरसारख्या सेलिब्रिटींची या कंपनीत गुंतवणूक, तुम्हीही वापरले असतील कंपनीचे प्रॉडक्ट)
जर SIP दरवर्षी 5 टक्क्यांऐवजी 10 टक्के वाढवली तर तुम्हाला मिळणारी रक्कम आणखी मोठी असेल. जर वर्षिक 10 टक्क्यांनी वाढ केली तर 35 वर्षात तुमची गुंतवणूक 32 लाख, 52 हजार होईल. तर 35 वर्षांनी म्हणजे 60 व्या वर्षी मिळणारी रक्कम 1.77 कोटी असेल.