ITR Refund: तुमचा टॅक्स रिफंड कधी येणार? वाचा कोणत्या ITR फॉर्ममुळे मिळते जलद रक्कम

Income Tax Refund Status For FY 2023-24: तुम्ही ITR दाखल केल्यानंतरही तुम्हाला अद्याप रिफंडची रक्कम (Income Tax Refund) मिळाली नसेल तर घाबरण्याची गरज नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे रिफंड मिळण्यात उशीर होतो.

Advertisement
Read Time: 2 mins
I
मुंबई:

आर्थिक वर्ष 2023-24 साठी अनेकांनी इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return Filing) दाखल केले असेल. त्यापैकी अनेकांना रिफंडची रक्कम देखील मिळणार आहे. तुम्ही ITR दाखल केल्यानंतरही तुम्हाला अद्याप रिफंडची रक्कम (Income Tax Refund) मिळाली नसेल तर घाबरण्याची गरज नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे रिफंड मिळण्यात उशीर (Income Tax Refund Delays) होतो. तुम्ही जो फॉर्म भरलाय त्यामुळे देखील रिफंड मिळण्याचा कालावधी कमी-जास्त होतो. ITR फॉर्म आणि रिफंडमधील कनेक्शन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे ITR फॉर्मच्या हिशोबानं टॅक्स रिफंड मिळण्यास किती उशीर लागू शकतो हे तुम्हाला समजेल.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ITR-1 किंवा ITR-4 सारखे सोपे फॉर्म लवकर प्रोसेस होतात. तर ITR-2 आणि ITR-3 यांना थोडा जास्त वेळ लागतो. तुम्ही आर्थिक वर्ष 2023-24 साठी टॅक्स रिटर्न  ITR-2 किंवा ITR-3 मार्फत दाखल केलं असेल तर तुम्हाला टॅक्स रिफंड (tax refund) अद्याप मिळाला नसल्याची शक्यता आहे. 

ITR-1

ITR-1 फॉर्म सर्वात सोपा आहे. विशेषत: तुमची सर्व कमाई पगाराच्या मार्फत असेल तर तुमचे टॅक्स रिटर्न लवकर तपासले जाते. तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये रिफंड मिळतो. अर्थात काही करदात्यांना एक आठवड्याच्या आत रिफंड मिळाला आहे. त्यांचा आयटीआयर फॉर्म दोन ते तीन दिवसांमध्येच प्रोसेस झाला होता.

( नक्की वाचा : वस्तू खरेदी करताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही! समजून घ्या नियम )
 

ITR-2

ITR-2 फॉर्ममध्ये थोडी जास्त माहिती द्यावी लागते. उदा. शेअर्स विक्रीतून झालेला फायदा. त्यामुळे हा फॉर्म तपासण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. साधरणपणे तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला टॅक्स रिफंड मिळण्यासाठी 20 ते 45 दिवस लागू शकतात. 

Advertisement

ITR-3

ITR-3 फॉर्म सर्वात क्लिष्ट असतो. विशेषत: तुमचा व्यवसाय असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरताना बरीच माहिती द्यावी लागते. त्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी देखील अधिक वेळ लागतो. साधरणत: ITR-3 फॉर्म भरलेल्या करदात्यांना त्यांचा रिफंड मिळण्यासाठी 30 ते 60 दिवस लागू शकतात.  

( नक्की वाचा : तुमच्या Income Tax मध्ये किती बचत होणार? वाचा Budget 2024 मधील सर्व बदल )
 

अनेकदा तुम्ही रिटर्न (ITR Filing 2024) खूप उशीरा भरला असेल तर कोणताही फॉर्मच्या माध्यामातून भरलेल्या रिटर्नचा रिफंड मिळण्यास उशीर होऊ शकतो. तुम्हा तुमचा टॅक्स रिटर्न दाखल केल्यानंतर त्याचे ई- व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला रिफंड मिळणार नाही. तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर 30 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करावं लागेल. 

Advertisement

आयकर विभागनं तुमचा ITR फॉर्म प्रोसेस केल्यानंतरच तुम्हाला रिफंड देण्यात येतो. सरकार तुमच्या रिटर्नची पूर्ण तपासणी करत नाही तोपर्यत तुम्हाला रिफंडमधील कोणताही पैसा दिला जात नाही.