Money Saving Tips: आज घरातील सर्वजण पैसे कमवत आहे. मात्र महिन्याच्या शेवटच्या तारखेला बँक अकाऊंटमध्ये पैसे राहत नाही. अधिकांश लोकांची सेव्हिंग होत नाही. यासाठी कमी पगार किंवा कमाई हे कारण नाहीये. व्यवस्थापनाच्या अभावामुळे महिन्याकाठी सेव्हिंग होण्यासाठी काही बदल करणे आवश्यक आहेत. नव्या वर्षापासून तुमच्या आर्थिक व्यवस्थापनात काही बदल केले तर वर्षाखाली तुमच्याकडे मोठी रक्कम जमा होईल.
सेव्हिंग करायची असेल तर वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनात हे ७ बदल करा...
१ निवृत्ती नियोजनासाठी पगारातील ४ टक्के पैसे काढण्याचा सल्ला दिला जातो. निवृत्तीनंतर दरवर्षी तुमच्या एकूण पगारापैकी फक्त ४ टक्के पैसे काढण्याचा नियम सांगितला जातो. ज्यामुळे पैसे जास्त काळ टिकतील आणि अचानक संपणार नाहीत.
२ खर्च नियंत्रित करण्यासाठी ५०-३०-२० नियम सर्वात लोकप्रिय आहे. त्यानुसार, तुमच्या पगाराच्या ५० टक्के आवश्यक खर्चासाठी, ३० टक्के जीवनशैली आणि छंदांसाठी आणि किमान २० टक्के बचत किंवा गुंतवणुकीसाठी दिले पाहिजे.
३ अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी ६X आपत्कालीन निधी नियम महत्त्वाचा मानला जातो. याचा अर्थ नोकरी गेल्यास किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत पैसे उधार घ्यावे लागू नयेत म्हणून तुमच्याकडे किमान सहा महिन्यांचा खर्च बाजूला ठेवावा.
४ कर्ज घेताना लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे ईएमआय खूप जास्त ठेवणे. ४० टक्के ईएमआय नियमात असं म्हटलं आहे की, तुमचा एकूण ईएमआय तुमच्या उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, अन्यथा, दरमहा मानसिक तणाव कायम राहतो.
५ शेवटचा, परंतु सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जीवन विमा नियम. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा राखण्यासाठी तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १५ पट जीवन विमा संरक्षण असावे.
६ सर्वात आधी Rule of 72 नियमाबद्दल बोलूया. हे सूत्र तुम्हाला पैसे दुप्पट होण्यासाठी मदत करेल. तुम्ही फक्त ७२ ला तुमच्या वार्षिक व्याजदराने भागा, ज्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी किती वेळ लागेल याची कल्पना येते.
७ २ पुढे Rule of 70 चा नियम येतो. जर महागाई ७ टक्क्यांच्या आसपास असेल तर तुमच्या पैशाचे मूल्य सुमारे १० वर्षांत निम्मे होऊ शकते. म्हणूनच फक्त बचत खात्यात पैसे ठेवणे पुरेसे नाही.