Muhurat Trading Stock : संपूर्ण देशभरात दिवाळीच्या सणाचा उत्साह शिगेला पोहोचला असून शेअर मार्केटमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वेगवेगळे स्टॉक्स खरेदी करण्याची ग्राहकांची लगबगही सुरु झाल्याचं समजते. मंगळवारी 22 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असून या दिवशी शेअर मार्केट काही मिनिटांसाठी उघडलं जातं. त्यानंतर मार्केटमध्ये एका तासाचं स्पेशल ट्रेंडिग सुरु केलं जातं. 'मुहूर्त ट्रेडिंग' यावर्षी मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे, दुपारी 1.45 ते दुपारी 2.45 या वेळेत हे मुहूर्त ट्रेडिंग पार पडेल. अशातच तुम्ही मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तुमचं नशिब चमकवण्याचा प्रयत्न करत असाल, तर याविषयी सेबीचे गुंतवणूक सल्लागार केदार ओक यांनी सविस्तरपणे माहिती सादर केली आहे.
SIP ठरलीय तारणहार
केदार ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार,संवत 2081 तसं बघितलं तर शेअर बाजारच्या दृष्टीने आव्हाहनात्मक गेलं.जागतिक पटलावर आर्थिक क्षेत्रात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी यामुळे या कालवधीत निर्देशांकाने नकारात्मक परतावा दिला.म्युच्युअल फंडातील मासिक सिप (SIP )बाजारात सातत्याने पैश्याचा ओघ धरून होता.
सोन्या-चांदीतील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ?
त्यामुळे हे आव्हान बाजाराने चांगले पेलले.इन्कम टॅक्समध्ये वाढविलेली मर्यादा त्याजोडीला कर्ज व्याजदरात करण्यात आलेली कपात आणि वस्तूसेवा कराचे पुनर्बांधणी यामुळे जवळजवळ अडीच लाख कोटी रुपये बाजारात उपलब्ध होत आहेत आणि होणार आहेत.आत्ताच चालू झालेला सणासुदीचा काळ त्यामुळे अपेक्षित असलेली मागणीतील वाढ यामुळे क्रयशक्तीला चालना मिळेल अशी अशा आहे. 2008 नंतर सोने किंवा चांदीच्या दरात आलेली मोठी तेजी यामुळे आता गुंतवणूकदारांनी नफा मिळवणे योग्य ठरेल. सध्याचे दर पाहाता सोने आणि चांदीत गुंतवणूक तूर्तास टाळावी असा सल्लाही ओक यांनी दिला आहे.
नक्की वाचा : Funny Video : 'अभ्यास केला नाही तर काय होईल?', चिमुकलीनं उत्तर देताच शाळेतील मॅडम कोमात अन् विद्यार्थी जोमात
संवत 2082 पूर्वसंध्येच्या काही समभाग सुचवीत असून ही गुंतवणूक दीर्घ स्वरूपाची राहील याची नोंद घ्यावी. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करणे हे फायद्याचे राहील, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.
कंपनीचे नाव | सध्याचा भाव | 52 आठवड्यांतील उच्चांक/नीचांक | अपेक्षित भाव | कालावधी |
ICICI बँक | 1436/- | 1500/1186 | 1700/- | किमान 1 वर्ष |
CDSL | 1611/- | 1989/1047 | 2100/ | किमान 1 वर्ष |
GRSE | 2596/- | 3538/1184 | 3300/- | किमान 1 वर्ष |
KPIL | 1269/- | 1352/786 | 1800/- | किमान 1 वर्ष |
मागील कालावधीत इंडेक्स आणि समभागांची किंमत यांचे गुणोत्तर प्रमाण हे चांगल्यापैकी झाले असल्यामुळे सर्वत्र स्थिरता आल्यास आपला बाजार चांगली तेजी दाखवू शकेल. योग्य गुंतवणूक करण्यासाठी "हाच तो क्षण हीच ती वेळ" असं कदाचित हे नवीन संवत 2082 सांगू इच्छिते.
नक्की वाचा : अरेरेरे..घाईघाईत फटाके फोडताय? हात भाजल्यावर काय कराल? Diwali च्या 'या' सेफ्टी टीप्स अजिबात विसरू नका